शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

उच्चशिक्षित तरुणांकडून घरातच गांजाची शेती; डार्कवेबवरून बियाण्यांची खरेदी, दाेघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 06:59 IST

crime news :

मुंबई : घरातच जमीनविरहीत हायड्रोपोनिक गांजाची शेती करणाऱ्या दुकलीला एनसीबीने अटक केली आहे. डोंबिवलीच्या पलावा सिटीत राहणारे हे उच्चशिक्षित तरुण इमारतीतील २ बीएचके फ्लॅटमध्ये ही शेती करत हाेते. यासाठी डार्कवेबद्वारे अ‍ॅम्स्टरडॅम, नेदरलॅण्ड येथून बियाणे विकत घेण्यात येत होते. या अटक केलेल्या दुकलीकडून १ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला तसेच त्यांचा फ्लॅटही सील करण्यात आला आहे.अमली पदार्थविराेधी पथकाने (एनसीबी) दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीच्या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून जावेद जहांगीर शेख आणि अर्शद खत्री या संशयितांची माहिती मिळाली. दोघांना ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत, डोंबिवलीतील पलावा सिटीमधील टू बीएचके फ्लॅटमध्ये ते हायड्रोपोनिक पद्धतीने गांजाची शेती करत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पथकाने तेथे छापा टाकून कारवाई केली. घरातून जमीनविरहीत शेतीसाठी आवश्यक साधनसामग्री, पीएच रेग्युलेटर, पाण्याचे पंप, कार्बन वायूचे सिलिंडर, अद्ययावत प्रकाश योजना, हवा खेळती ठेवण्यासाठी केलेली व्यवस्था आदी यंत्रणा सापडली.हा फ्लॅट रेहान खानच्या मालकीचा असून, तो सौदी अरेबियाला राहताे. त्याने या शेतीसाठी अर्शदला फंडिंग केल्याची माहिती समोर आली आहे. अर्शद हा हायड्रोपोनिक लागवडीतील तज्ज्ञ आहे. अर्शदला एक ग्रॅम गांजा उत्पादित करण्यासाठी अडीज हजार रुपये खर्च येत होता तर बाजारात त्याची आठ हजार रुपयांना विक्री व्हायची. त्याने आतापर्यंत अशी ४ पिके घेतल्याची माहिती तपासात समोर आली आहे. हायप्रोफाईल लोकांमध्ये याची जास्त मागणी आहे. एनसीबीचे पथक सध्या त्यांच्या मुंबईतील नेटवर्कचा शोध घेत आहे. तसेच याच प्रकरणात अन्य आराेपी साहिल फ्लॉकोचाही शोध सुरू आहे.

कुठे बीटकॉइन्स, तर कुठे स्नॅपचॅट आणि व्हॉट्सअ‍ॅपहायड्रोपोनिक गांजाची खरेदी-विक्री बिटकॉइन्सद्वारे करण्यात येत होती. ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्नॅपचॅट आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडिया ॲप्सचा आधार घेण्यात आला होता.आफ्रिकन नागरिकाकडून ३० ग्रॅम कोकेन जप्तदुसऱ्या कारवाईत एनसीबीने मूळचा आफ्रिकन वंशाचा नागरिक ओनुरह सॅम्युएल माईक याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ३० ग्रॅम कोकेन जप्त केले. माईक हे कोकेन मुंबईच्या अंधेरी, वांद्रे, सांताक्रुझ भागात विकत असे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई