Kapil Sharma : कॅनडामधील कपिल शर्माच्या KAP's कॅफेवर गोळीबार करणाऱ्या शूटरला दिल्लीत अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 11:08 IST2025-11-28T11:07:43+5:302025-11-28T11:08:38+5:30
Kapil Sharma : दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने कॅनडामधील कपिल शर्माच्या KAP's कॅफेमध्ये झालेल्या गोळीबारात सहभागी असलेला शूटर बंधू मान सिंह सेखोनला अटक केली आहे.

Kapil Sharma : कॅनडामधील कपिल शर्माच्या KAP's कॅफेवर गोळीबार करणाऱ्या शूटरला दिल्लीत अटक
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने कॅनडामधील कपिल शर्माच्या KAP's कॅफेमध्ये झालेल्या गोळीबारात सहभागी असलेला शूटर बंधू मान सिंह सेखोनला अटक केली आहे. बंधू मान सिंह सेखोन हा गँगस्टर गोल्डी ब्रारशी संबंधित आहे. गोळीबारानंतर तो भारतात परतला. सेखोन हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर गोल्डी ढिल्लोनच्या संपर्कात होता. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचं हे एक मोठं यश मानलं जात आहे.
अटक करण्यात आलेला आरोपी बंधू मान सिंह सेखोन हा कॅनडामधील गोळीबार घटनेतील मुख्य शूटर असल्याचं सांगितलं जातं. KAP's कॅफेमध्ये झालेल्या गोळीबारामागील कट समोर येण्यासाठी ही अटक महत्त्वाची आहे. सेखोनचे गोल्डी ब्रारशी संबंध असल्याने दिल्ली पोलीस पुढील तपास करत आहेत.
बंधू मान सिंह सेखोन याने कॅनडामधील कपिल शर्माच्या KAP's कॅफेमध्ये गोळीबार केला. गोळीबारानंतर तो ताबडतोब भारतात पळून गेला. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यानंतर त्याला दिल्लीत अटक केली.
तपासात असं दिसून आलं आहे की, बंधू मान सिंह सेखोन हा गँगस्टर गोल्डी ब्रारचा सहकारी आहे. शिवाय तो लॉरेन्स बिश्नोई गँगचाचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टप गोल्डी ढिल्लोन याच्या संपर्कात होता. पोलीस आता या गँगस्टर कनेक्शनची सखोल चौकशी करत आहेत.