मोमोज खायला मामाने नेले होते ९ वर्षाच्या भाचीला, नंतर शेतात 'या' अवस्थेत सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 19:58 IST2022-03-07T19:58:16+5:302022-03-07T19:58:50+5:30
Sexual Abuse And Murder Case : बलात्कार करण्यास न मिळाल्याने मुलीला ठेचून मारण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला.

मोमोज खायला मामाने नेले होते ९ वर्षाच्या भाचीला, नंतर शेतात 'या' अवस्थेत सापडला मृतदेह
अलीगढ : उत्तर प्रदेशच्या अलीगढमधील इग्लास परिसरात एक निर्दयी घटना समोर आली आहे. येथे एका 9 वर्षीय भाजीला मामाने मोमोज खायला देण्याच्या बहाण्याने नेले होते. मात्र बलात्कार करण्यास न मिळाल्याने मुलीला ठेचून मारण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला.
हे संपूर्ण प्रकरण आहे
माहिती देताना मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ते शेतात बटाटे खोदण्यासाठी मजूर म्हणून गेले होते. यादरम्यान, वस्तीतील मामाने बाजारातून वस्तू आणण्याच्या बहाण्याने घरी उपस्थित असलेल्या तीन मुलींना नेले. मनोज नावाच्या तरूणाने काही वस्तू घेऊन दोघी बहिणींना घरी पाठवल्याचे नातेवाईकांनी सांगितले. ९ वर्षांच्या तिसर्या मुलीने मोमोज खाण्याची इच्छा व्यक्त केली असता त्याने तिला आपल्यासोबत नेले.
रात्री उशिरापर्यंत मुलगी परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. मुलीच्या आईच्या म्हणण्यानुसार, आरोपी तरुण मनोजही मुलीला शोधण्यासाठी सोबत होता आणि त्याने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गावातील कोणीतरी या परिसरात असलेल्या बागेत नजर टाकली असता एका रिकाम्या जागेत 9 वर्षीय मुलीचा मृतदेह विटेने ठेचलेल्या अवस्थेत आढळून आला. मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली. मुलीचे कपडेही अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आले.
माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि तपास करून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आरोपीच्या शोधात व्यस्त आहेत. ज्या ठिकाणी मुलीचा मृतदेह सापडला, तेथे चिल्लम पिणाऱ्या नशेबाजांचा जमाव जमला असून आरोपी मनोज हाही नशेबाज असल्याचे परिसरातील नागरिक सांगत आहेत. आरोपीवर कारवाई व्हावी यासाठी कुटुंबीय मागणी करत आहेत.
योगीच येणार! मिर्झापूरमध्ये गुजरात पोलीस म्हणाला, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई
बॉयफ्रेंडने धोका दिल्याने पाटण्याची सुमन उतरली वेश्याव्यवसायात, कॉल गर्ल शेफानीलाही ठोकल्या बेड्या
माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की, 9 वर्षांची मुलगी रात्री उशिरा बेपत्ता झाली होती, नात्यातील मामाने मोमोज देण्याच्या बहाण्याने पळवून नेले आणि तिचा खून केला. मृत तरुणीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.