Brutal murder of lady ST conductor's throat slit; Body found in Antri Khedekar Shivara | खळबळजनक! एसटी वाहक तरूणीची गळा चिरून निर्घृण हत्या; अंत्री खेडेकर शिवारात आढळला मृतदेह

खळबळजनक! एसटी वाहक तरूणीची गळा चिरून निर्घृण हत्या; अंत्री खेडेकर शिवारात आढळला मृतदेह

ठळक मुद्देमाधुरी भीमराव मोरे (२५, रा. अंत्री खेडेकर) असे मृत तरूणीचे नाव आहे.१६ एप्रिलच्या सकाळी अंत्री खेडेकर शिवरात मॉर्निंग वाकसाठी गेलेल्या नागरीकांना त्यांचा मृतदेह आढळून आला.

चिखली : बुलडाणा आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या २५ वर्षिय घटस्फोटीत तरूणीचा तालुक्यातील अंत्री खेडेकर शिवरात गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतक तरूणीच्या गळ्यावर तसेच शरीरावर धारधार शस्त्राने वार केल्याचे व अंगावर चटके दिल्याच्या खूणा आहेत.


त्यामुळे तिचा खून झाला असल्याचा कयास व्यक्त केला जात असून पोलिस त्या दिशेने तपास करत आहेत. माधुरी भीमराव मोरे (२५, रा. अंत्री खेडेकर) असे मृत तरूणीचे नाव आहे. बुलडाणा आगारात वाहक पदावर त्या कार्यरत होत्या. १५ एप्रिलची ड्यूटी संपल्यानंतर आठवडी सुटी असल्याने अंत्री खेडेकरला घरी परतणार होत्या. मात्र, रात्री त्या घरी पोहचल्या नाही. १६ एप्रिलच्या सकाळी अंत्री खेडेकर शिवरात मॉर्निंग वाकसाठी गेलेल्या नागरीकांना त्यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत अंढेरा पोलिसांना माहिती दिली असता ठाणेदार राजरत्न आठवले यांनी पथकासह घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असता तरूणीचा गळा चिरलेला व शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याचे तसेच चटके दिल्याच्या खूणा पार्थिवार आढळून आल्या आहेत.

 

धक्कादायक! मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत ठेवला पोत्यात भरून; सहा हजारांच्या तगाद्यामुळे वृद्ध घरमालकिणीची हत्या


घटनेचे गांभिर्य पाहता बुलडाणा येथून श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते. ठसे तज्ज्ञांनीही घटनास्थळाची पाहणी केली असून आवश्यक अशी माहिती व काही पुरावे हस्तगत केले आहेत. मृत महिला माधुरी मोरे यांचा ५ वर्षांपूर्वी घटस्फोट झालेला आहे. यापूर्वी त्या जाफ्राबादार आगारात कार्यरत होत्या.

Web Title: Brutal murder of lady ST conductor's throat slit; Body found in Antri Khedekar Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.