भावोजीने मेहुणीची अब्रू लुटली; सतत ४ दिवस करत होता बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 22:12 IST2021-12-28T22:12:30+5:302021-12-28T22:12:57+5:30
Rape Case : भावोजीने मुलीला ४ दिवस आपल्याजवळ ठेवूलं आणि सतत तिच्यावर बलात्कार केला.

भावोजीने मेहुणीची अब्रू लुटली; सतत ४ दिवस करत होता बलात्कार
राजस्थान - राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातून नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. भावोजीवर आपल्या अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी तक्रारी दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पॉक्सोचा गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.
भावोजीने मुलीला ४ दिवस आपल्याजवळ ठेवूलं आणि सतत तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणावर बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष कनीज फातमा यांनी सांगितले की, प्रकरण कोटाच्या नयापुरा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. जिथे दीड वर्षापूर्वी आरोपीचे लग्न झालं होतं. आरोपीला दारूचे व्यसन असून तो मोलमजुरी करतो. काही दिवसांपूर्वी आरोपीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून पत्नीने त्याला सोडचिठ्ठी दिली आणि ती विष प्यायली होती.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी त्याच्या १७ वर्षीय मेहुणीला कॉलेजमधून गावात घेऊन गेला. कॉलेजमधून मुलगी घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर नातेवाईकांच्या संशयावरून पोलीस पीडित मुलीच्या भावोजीच्या घरी पोहोचले. पोलीस घरी पोहोचताच पीडित मुलगी त्याच्या घरी आढळून आली. पोलिसांनी तात्काळ आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.