लग्नमंडपातून नवरदेवाच्या आईचे दागिने लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 00:20 IST2020-12-04T00:20:34+5:302020-12-04T00:20:43+5:30

ब्रह्मांडमधील ‘श्रीजी कॉम्प्लेक्स’ येथील रहिवासी शीतल शर्मा (नावात बदल) यांच्या मुलाचे ३० नोव्हेंबरला लग्न होते

The bride's mother's jewelery was stolen from the wedding tent | लग्नमंडपातून नवरदेवाच्या आईचे दागिने लुबाडले

लग्नमंडपातून नवरदेवाच्या आईचे दागिने लुबाडले

ठाणे : वधूवरासोबत फोटो काढण्यासाठी मंचावर गेलेल्याने नवरदेवाच्या आईचेच दागिने चोरल्याचा धक्कादायक प्रकार घोडबंदर रोड येथे मंगळवारी रात्री घडला. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अनाेळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेने पाहुणेमंडळी नाहक संशयाच्या भोवऱ्यात अडकली.

ब्रह्मांडमधील ‘श्रीजी कॉम्प्लेक्स’ येथील रहिवासी शीतल शर्मा (नावात बदल) यांच्या मुलाचे ३० नोव्हेंबरला लग्न होते. ‘जलसा लॉन’मध्ये विवाहसमारंभ होता. रात्री १०.५० च्या दरम्यान मंचावर वधूवरासोबत फोटोसाठी नातेवाईकांनी गर्दी केली होती. फोटो काढण्यासाठी नवरदेवाची आई शीतल यांनाही मंचावर बोलवले. त्यावेळी त्यांनी हातातील दागिन्यांची पर्स रिकाम्या खुर्चीवर ठेवली. फोटो काढून झाल्यानंतर पर्स घेण्यासाठी गेल्या, मात्र खुर्चीवर पर्स नव्हती. पर्समध्ये ३५ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, ९० हजारांची रोकड आणि मोबाइल असा सुमारे दोन लाखांचा ऐवज होता. 

व्हिडीओशूट तपासणार
कॅमे-यांचे फुटेज तसेच व्हिडीओ शूटिंग करणा-यांकडून घटनास्थळाच्या चित्रणाची माहिती घेऊन चोरट्याचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी व्यक्त केला.

Web Title: The bride's mother's jewelery was stolen from the wedding tent