मिठी नदीत सापडला तरुणाचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 19:11 IST2019-06-07T19:08:01+5:302019-06-07T19:11:13+5:30
याप्रकरणी विनोबा भावे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मिठी नदीत सापडला तरुणाचा मृतदेह
ठळक मुद्देकुजलेला मृतदेह ३५ ते ४० वयोगटातील पुरुषाचा मिठी नदीत आज दुपारी १.३० वाजताच्या सुमारास एका पुरुषाचा मृतदेह सापडला या मृतदेहाची ओळख पटविण्याचं काम पोलीस करत आहेत.
मुंबई - कुर्ला कालीन एअरपोर्ट रोडनजीक मिठी नदीत आज दुपारी १.३० वाजताच्या सुमारास एका पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. हा कुजलेला मृतदेह ३५ ते ४० वयोगटातील पुरुषाचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी विनोबा भावे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
आज दुपारी हा कुजलेला अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला असून पोलिसांनी तो राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या मृतदेहाची ओळख पटविण्याचं काम पोलीस करत आहेत.
मुंबई - मिठी नदीत ३५ ते ४० वयोगटातील अनोळखी तरुणाचा सापडला मृतदेह https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) June 7, 2019