कॉलेजबाहेर सापडला मृतदेह; महिलेच्या हत्येनंतर आता 32 वर्षीय तरुणाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 17:03 IST2022-07-16T17:02:38+5:302022-07-16T17:03:16+5:30
Crime News : पोलिसांनी गुन्हा नोंद करून लवकरच मारेकऱ्याची ओळख पटवून अटक करण्याचा दावा केला आहे.

कॉलेजबाहेर सापडला मृतदेह; महिलेच्या हत्येनंतर आता 32 वर्षीय तरुणाचा खून
भिवानी : हरियाणातील भिवानी जिल्ह्यात हत्येची प्रकरणे समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी ढाणा नरसाण दिराने वहिनीचा गळा चिरून खून केला होता. आता बावनीखेडा शहरात दोन मुलांच्या बापाचा शिरच्छेद करून खून करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करून लवकरच मारेकऱ्याची ओळख पटवून अटक करण्याचा दावा केला आहे.
शुक्रवारी पहाटे महिला महाविद्यालयाबाहेर ३२ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने बावनीखेडा शहरात खळबळ उडाली आहे. दीपक असे मृताचे नाव असून तो बावनीखेडा येथील रहिवासी आहे. मृतकाचे नातेवाईक लाला राम यांनी सांगितले की, दीपक हा घरांमध्ये फरशा बसवण्याचे काम करायचा. काल रात्री तो कामावरून परतला आणि रात्री आठ वाजता घराबाहेर पडला. सकाळी त्याचा मृतदेह महिला महाविद्यालयाबाहेर आढळून आला. दीपकचे डोकं विटांनी ठेचून त्याची हत्या केल्याचे त्यांनी सांगितले. दीपकची हत्या कोणी आणि का केली, हे कोणालाच माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणाचा तपास करत असलेले एएसआय अमरजीत यांनी सांगितले की, दीपकची हत्या कोणी आणि का केली, याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. गुन्हा दाखल करून तपास सुरु केला जात आहे. दीपकला 5 आणि 2 वर्षांची दोन निरागस मुले आहेत. सततच्या गुन्हेगारीमुळे भिवानी पोलिसांवर टीका होताना दिसत आहे.