खळबळजनक! गस्तीवर निघालेल्या दोन पोलिसांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 21:03 IST2020-06-30T20:54:35+5:302020-06-30T21:03:57+5:30

बडोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बुटाणा या गावात पोलीस चौकीच्या दोन पोलिसांवर चौकीपासून काही अंतरावर अज्ञातांनी गोळीबार केला.

The bodies of two policemen on patrolling were found on the side of the road | खळबळजनक! गस्तीवर निघालेल्या दोन पोलिसांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळले 

खळबळजनक! गस्तीवर निघालेल्या दोन पोलिसांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळले 

ठळक मुद्देदोन पोलीस कर्मचारी रात्री १२ वाजताच्या सुमारास गस्त घालण्यासाठी निघाले होते. पोलीस चौकीपासून ५०० मीटर अंतरावर दुचाकीवरून आलेलेल्या दोन अज्ञातांनी गस्तीवरील पोलिसांवर गोळीबार करून हत्या केली आहे. या हत्याप्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी ८ पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे. 

सोनीपत - गस्तीसाठी निघालेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यात खळबळजनक घटना घडली आहे. या जिल्ह्यात सोमवारी गस्तीवर बाहेर गेलेल्या दोन पोलिसांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागात खळबळ उडाली. बडोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बुटाणा या गावात पोलीस चौकीच्या दोन पोलिसांवर चौकीपासून काही अंतरावर अज्ञातांनी गोळीबार केला. डीजीपी मनोज यादव यांनी सांगितले, या हत्याप्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी ८ पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन पोलीस कर्मचारी रात्री १२ वाजताच्या सुमारास गस्त घालण्यासाठी निघाले होते. विशेष पोलीस अधिकारी कप्तान सिंग आणो कॉन्स्टेबल रविंदर असं या दोन मृत पोलिसांचे नाव आहे. पोलीस चौकीपासून ५०० मीटर अंतरावर दुचाकीवरून आलेलेल्या दोन अज्ञातांनी गस्तीवरील पोलिसांवर गोळीबार करून हत्या केली आहे. दोन्ही पोलिसांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळल्याने खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच बडोदा पोलीस ठाण्याचे एएसपी उदयसिंग मीणा, एसएचओ उदयसिंग मीना यांच्यासह विविध पोलीस ठाण्याचे आणि गुन्हे अन्वेषण यंत्रणेचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकाऱ्यांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या 

 

TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

 

अज्ञात महिलेचा मृतदेह टेम्पोत आढळल्याने खळबळ

 

'त्या' ट्विटवरून वाढल्या दिग्विजय सिंह यांच्या अडचणी, भाजपाने दाखल केला गुन्हा

 

माजी सैनिकाची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट 

Web Title: The bodies of two policemen on patrolling were found on the side of the road