शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

गीता जैन यांच्यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा भाजपाचा खटाटोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 4:15 PM

तक्रारदार नगरसेविका रुपाली मोदी यांनी आधीच पोलीसांना जबाब देत धक्काबुक्की प्रकरणी आपली कोणती तक्रार नसल्याचे स्पष्ट केले होते.

ठळक मुद्देगुन्हा दाखल करण्यासाठी भाजपाच्या महापौर ज्योत्सना हसनाळे, उपमहापौर हसमुख गेहलोत, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांच्यासह भाजपा नगरसेवक, पदाधिकारी तब्बल दोन - अडिज तास काशिमीरा पोलीस ठाण्यात ठिय्या धरला होता. उपनिरीक्षक दिपक धनवटे यांनी रुपाली यांचा जबाब त्यांचे पती राजु समक्ष नोंदवून घेतला होता. तर गीता जैन यांनी देखील तक्रार दिली नव्हती.

मीरारोड - गेल्या वर्षी छत्री वाटपाच्या कार्यक्रमावरुन घडलेल्या वादाचा मुद्दा उपस्थित करत महिला आमदार गीता जैन यांच्याविरोधात अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपाच्या महापौर ज्योत्सना हसनाळे, उपमहापौर हसमुख गेहलोत, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांच्यासह भाजपा नगरसेवक, पदाधिकारी तब्बल दोन - अडिज तास काशिमीरा पोलीस ठाण्यात ठिय्या धरला होता. भाजपा माजी आमदार नरेंद्र मेहतांवर २० वर्षां पासूनच्या तक्रारीवर अ‍ॅट्रोसिटी दाखल होते तर आमदार गीता यांच्यावर ८ महिन्यांपूर्वी झालेल्या घटने प्रकरणावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी भाजपा शिष्टमंडळाने केली. तर तक्रारदार नगरसेविका रुपाली मोदी यांनी आधीच पोलीसांना जबाब देत धक्काबुक्की प्रकरणी आपली कोणती तक्रार नसल्याचे स्पष्ट केले होते.गेल्या वर्षी हाटकेश भागात महापालिकेच्या माध्यमातुन नगरससेवक निधी वापरुन भाजपा नगरसेविका रुपाली मोदी यांनी ज्येष्ठ नागरिक निवारा रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकातील मोकळ्या जागेत बनवले होते. गेल्या वर्षी ६ जुलै रोजी त्या भागातील इमरान हाशमी यांनी ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित केले होता व त्यासाठी भाजपा नगरसेविका असलेल्या गीता जैन यांना पाचारण केले होते. गीता व नरेंद्र मेहतांमधील वाद सर्वश्रुत होता तर रुपाली ह्या मेहता समर्थक मानल्या जात असल्याने रुपाली व त्यांचे पती यांनी तेथे जाऊन कार्यक्रम बंद करा म्हणुन दरडावण्यास सुरवात केली होती. तसेच छत्री ठेवलेले टेबल हटवण्याचा प्रयत्न केला असता त्यावरुन धक्काबुक्की व बोलाचाली झाल्या होत्या. त्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. काशिमीरा पोलीसांनी त्या प्रकरणी रुपाली यांना तक्रार देण्या बाबत विचारणा केली असता त्यांनी आपणास कोणाविरुध्द तक्रार द्यायची नाही असा लेखी जबाब काशिमीरा पोलीसांना दिला होता. उपनिरीक्षक दिपक धनवटे यांनी रुपाली यांचा जबाब त्यांचे पती राजु समक्ष नोंदवून घेतला होता. तर गीता जैन यांनी देखील तक्रार दिली नव्हती.दरम्यान सोमवारी भाजपाच्या सेव्हन सक्वेअर शाळे जवळील जिल्हा पक्ष कार्यालयात काही ठारावीक नगरसेवक, पदाधिकारी आदिंची बैठक बोलावण्यात आली होती. त्या बैठकी नंतर नगरसेविका रुपाली मोदी यांच्यासह भाजपाच्या महापौर ज्योत्सना हसनाळे, उपमहापौर हसमुख गेहलोत, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे, नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील, राकेश शाह, प्रशांत दळवी, आनंद मांजरेकर, संजय थेराडे, अनिल विराणी, दिनेश जैन, नगरसेविका शानु गोहिल, अनिता मुखर्जी, विणा भोईर, हेतल परमार, सुरेखा सोनारे, माजी नगरसेवक अनिल भोसले, भगवती शर्मा, अनुसुचीत जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष संगीता धाकतोडे, सुनिल धापसे, सुनिल कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष वनिता बने व अन्य पदाधिकारी - कार्यकर्ते मोठ्या संख्येने काशिमीरा पोलीस ठाण्यात जमले.वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या दालनात ठिय्या धरत ६ जुलै रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी रुपाली यांच्या तक्रारी वरुन आमदार गीता जैनविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा अशी जोरदार मागणी केली. गुन्हा दाखल करत नाही तो पर्यंत आम्ही येथुन हटणार नाही, नरेंद्र मेहतांवर २० वर्षापूर्वी पासुनच्या प्रकरणात अ‍ॅट्रोसिटी पोलीस दाखल करत असतील तर ८ महिन्यापूर्वी घडलेल्या या वादाप्रकरणी देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी चालवली. हजारे यांनी शिष्टमंडळास, रुपाली मोदी यांनी दिलेला जबाब याची माहिती देतानाच योग्य व कायदेशीर असेल त्या प्रमाणे कार्यवाही केली जाईल असे आश्वस्त केल्याचे सुत्रांनी सांगितले. तब्बल दोन अडिज तासांनी महापौरांसह नगरसेवक, पदाधिकारी आदि पोलीस ठाण्यातून बाहेर पडले.

टॅग्स :Policeपोलिसmira roadमीरा रोडMLAआमदारBJPभाजपा