शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

हसत हसत कोर्टातून बिशप बाहेर पडले, ननवर बलात्कार केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 4:11 PM

Rape Case : दोन वर्षांत एका ननवर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप असलेला माजी धर्मगुरू बिशप फ्रँको मुलक्कल यांची आज न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

तिरुअनंतपुरम - केरळमध्ये या बलात्काराच्या प्रकरणामुळे प्रचंड संताप पसरला होता आणि रस्त्यावर निदर्शने करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या.   दोन वर्षांत एका ननवर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप असलेला माजी धर्मगुरू बिशप फ्रँको मुलक्कल यांची आज न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

५७ वर्षीय फ्रँको मुलक्कल हे भारतातील पहिले कॅथलिक बिशप आहेत, ज्यांच्यावर एका ननच्या तक्रारीवरून बलात्काराचा आरोप  करण्यात आला होता. १०० दिवसांहून अधिक काळ चाललेल्या खटल्यानंतर, अतिरिक्त सत्र न्यायालयाने एका ओळीचा निकाल दिला की, तो केलेल्या आरोपांसाठी दोषी नाही.निकालानंतर तो हसतमुखाने कोट्टायम येथील न्यायालयातून बाहेर पडताना दिसला२०१८ मध्ये, जालंधर बिशपच्या अधिकाराखालील मिशनरीज ऑफ जीजस काँग्रीजेशनच्या ननने  २०१४ ते २०१६ दरम्यान बिशप फ्रँको यांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला होता. बिशप यांनी आरोप फेटाळून लावले. चर्च, पोलिस आणि केरळ सरकारकडून कारवाईची मागणी करणाऱ्या नन्स यांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं करून कारवाईची मागणी करण्यात आली. 

पाच नन्सनी उच्च न्यायालयाबाहेर आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी काही महिन्यांनंतर तपास सुरू केला. नन्सनीही व्हॅटिकनला पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी केली. नन्सवर चर्चमध्ये जोरदार टीका झाली आणि त्यांना धमक्या, आरोपांच्या लाटेने लक्ष्य करण्यात आले.आरोपांची चौकशी करणाऱ्या एका विशेष तपास पथकाने अखेरीस सप्टेंबर 2018 मध्ये बिशपला अटक केली. बिशप फ्रँको मुलक्कल यांना पोलिसांनी तीन दिवसांच्या चौकशीनंतर अटक केली. नोव्हेंबर २०१९ मध्ये खटला सुरू झाला. त्यानंतर कोट्टायमचे पोलीस प्रमुख एस हरी शंकर यांनी आजच्या निकालावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. "या प्रकरणात सबळ पुरावे होते. कोणताही साक्षीदार विरोधक ठरला नाही," असे त्याने एनडीटीव्हीला सांगितले.न्यायालयाने प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांना त्यांच्या परवानगीशिवाय खटल्याशी संबंधित काहीही प्रकाशित करण्यास मनाई केली होती. २०२० मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने बिशपची बलात्काराच्या आरोपांविरुद्धची याचिका फेटाळण्याच्या आधीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती नाकारली होती. मुलक्कल यांनी न्यायालयाला सांगितले होते की, त्यांना दोषी ठरवण्यात आले होते आणि त्या ननच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्न उपस्थित केले होते. परंतु सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयाची घोषणा केली आणि म्हटले, "आम्हाला निकालात कोणतीही त्रुटी आढळली नाही, ज्यामुळे त्याचे पुनर्विचार करण्याची मागणी केली गेली आहे. त्यानुसार, पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली."

टॅग्स :PoliceपोलिसKeralaकेरळCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषण