in bihar wife Kills Husband Over Illegal Relationship puts Feviquick in his Eye Nose Ear | अवैध संबंधात अडथळा ठरायचा पती; डोळे-नाक-कानात फेविक्विक टाकून निर्घृण हत्या

अवैध संबंधात अडथळा ठरायचा पती; डोळे-नाक-कानात फेविक्विक टाकून निर्घृण हत्या

गया: विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नीनं हत्या केली आहे. माहेरच्या माणसांसोबत मिळून पत्नीनं पतीचा अतिशय निर्घृणपणे खून केला. गया जिल्ह्यातल्या मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पत्नीच्या नातेवाईकांनी आधी पतीला मारहाण केली. त्यानंतर त्याच्या डोळ्यात, कानात, नाकात फेविक्विक टाकून त्याच्यावर चाकूनं वार केले. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे.

सलेमपूरमध्ये वास्तव्यास असलेल्या मुन्ना गुप्ताची पत्नी जुलीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्याची माहिती मुन्नाला मिळाली. त्यानं पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह स्थितीत पकडलं. तेव्हापासून मुन्ना आणि जुलीमध्ये वाद सुरू होते. शुक्रवारीदेखील दोघांमध्ये याच विषयावरून वाद झाला. त्यानंतर जुलीनं तिचे आई, वडील आणि अन्य कुटुंबियांसह मुन्नाला मारहाण केल्याच आरोप आहे.

बेदम मारहाणीमुळे मुन्ना बेशुद्ध पडला. त्यानंतर आरोपींनी त्याच्या डोळ्यात, कानात, नाकात फेविक्विक टाकलं. आरोपी इथेच थांबले नाहीत. त्यांनी मुन्नाच्या शरीरावर चाकूनं वार केले. यानंतर आरोपींनी मुन्नाचा मृतदेह एका गोणीत भरला. मृतदेह जाळण्यासाठी आरोपी घराबाहेर पडले. ते पेट्रोल खरेदी करण्यासाठी निघाले असताना पोलिसांना संशय आला आणि संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

पोलिसांना पाहताच आरोपी दुचाकी आणि मृतदेह टाकून पळू लागले. पोलिसांनी दुचाकीच्या क्रमांकावरून आरोपींची शोधाशोध सुरू केली. मुन्नाची पत्नी जुली, त्याचे सासरे दुर्गा साव आणि सासू संजू देवी यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय आणखी दोन आरोपींचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Web Title: in bihar wife Kills Husband Over Illegal Relationship puts Feviquick in his Eye Nose Ear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.