शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

बिहार पोलीस मुंबईत दाखल; रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 9:18 AM

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी बिहारच्या पाटण्यातील राजीवनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाला नवे वळण आले आहे. सुशांतच्या वडील के. के. सिंह यांनी मंगळवारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर (FIR Against rhea chakraborty) गंभीर आरोप करत गुन्हा नोंदवला आहे. बिहारमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार आहे.

बिहारमध्ये रियाविरोधात तक्रार दाखल होताच आता कारवाईसाठीची पावलं उचलली जाण्यास सुरुवात झाली आहे. बिहारमधून चार पोलिसांचं पथक मुंबईत दाखल झालं आहे. त्यामुळे आता बिहार पोलीस या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच बिहार पोलीस या प्रकरणात मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासाचे महत्त्वाचे दस्तऐवज मागू शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी बिहारच्या पाटण्यातील राजीवनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रिया चक्रवर्तीसह इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरिंडा, श्रुती मोदी आणि इतरांविरोधात फसवूणक, दगाबाजी, ओलीस ठेवणे आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. सुशांतच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, "या कटात रिया आणि तिच्या कुटुंबातील इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती यांनी माझ्या मुलासोबत जवळीक वाढवली होती आणि हे सगळेच माझ्या मुलाच्या प्रत्येक बाबत हस्तक्षेप करायला लागले. तसंच सुशांत ज्या घरात राहत होता तिथे भूत-प्रेत असल्याचं सागंत त्याला ते सोडायला लावलं, असा आरोप सुशांतच्या वडिलांनी रियावर केला आहे.

१७ कोटींपैकी १५ कोटींचे व्यवहार संशयास्पद

सुशांतच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या वर्षी त्याच्या खात्यात १७ कोटी होते. त्यापैकी १५ कोटी त्याचा संबंध नसलेल्या खात्यात वळते झाले. यात सुशांतचे क्रेडिट, डेबिट कार्ड रियाकडेच होते. त्यामुळे तिने आणि तिच्या कुटुंबाने पैसे खर्च केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

सीबीआय तपासाची मागणी

सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेक लोकांनी, संघटनांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत व्हावा अशी मागणी केली होती. मात्र मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सक्षम असून सीबीआय तपासाची गरज नसल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्प्ट केलं. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अनेकांचा जबाब नोंदवला असून यापुढेही अनेकांची चौकशी केली जाणार आहे.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतPoliceपोलिसMumbaiमुंबईBiharबिहार