शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरातील पुजाऱ्यावर बेच्छूट गोळीबार, स्थानिकांच्या बेदम मारहाणीत एका आरोपीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 12:52 IST

आज पहाटे 4.30 च्या सुमारास कंकाली मंदिरात ही घटना घडली, यादरम्यान दर्शन करण्यासाठी आलेल्या एका भक्तालाही गोळी लागली.

दरभंगा:बिहारच्यादरभंगामध्ये(Darbhanga) एका पुजाऱ्याची मंदिरात गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरभंगातील राज संकुलात असलेल्या कंकाली मंदिराचे मुख्य पुजारी राजीव कुमार झा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आज पहाटे 4.30 च्या सुमारास राजीव झा पूजा करत असताना हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, 4 हल्लेखोर कारमधून मंदिरात आले होते. मंदिरात प्रवेश करुन त्यांनी राजीव झा यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि पळ काढला. यादरम्यान दर्शन करण्यासाठी आलेल्या एका भक्तालाही गोळी लागली. या हल्ल्यानंतर पळून जात असताना स्थानिकांनी 3 हल्लेखोरांना पकडलं तर एक हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाला. स्थानिकांनी हल्लेखोरांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत एका हल्लेखोराचा मृत्यू झाला तर इतर दोघांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, जखमी भक्ताला पारस रुग्णालयात तर दोन आरोपींना डीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

पुतण्याच्या वादाची काकाला शिक्षा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दारुबंदीनंतर संध्याकाळपासून मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात अमली पदार्थांचे व्यसन करण्यास गर्दी होते. त्यापैकी एकानं कॉल करण्यासाठी पुजाऱ्याच्या भाच्याकडे मोबाइल मागितला, जो पुजाऱ्याच्या भाच्यानं दिला नाही. यावरुन बुधवारी संध्याकाळी पुजाऱ्याच्या पुतण्याचे त्याच्यासोबत भांडण झाले होते. या वादादरम्यान पुजारी राजीव झा दोघांमधला वाद सोडवण्यासाठी आले पण हा वाद एकदम टोकाला गेला. याच वादामुळे झा यांच्यावर हल्ला झाल्याची पार्थमिक माहिती आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारdarbhanga-pcदरभंगाFiringगोळीबार