Video : दुचाकी जळीतकांड सत्र सुरूच; सायन येथे १७ बाईक्सना लावली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 13:38 IST2018-12-14T13:38:46+5:302018-12-14T13:38:49+5:30
मुंबईत या अगोदरही समाजकंटकांकडून वाहने जाळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे अलीकडेच ठाण्यात देखील आपापसात भांडणाचे पर्यवसन दुचाकी जळीतकांडात झाले होते. मुंबईत देखील काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारे इमारतीच्या पार्किंग प्लॉटमध्ये पार्क केलेल्या बाईक्सना आग लावण्यात आली होती.

Video : दुचाकी जळीतकांड सत्र सुरूच; सायन येथे १७ बाईक्सना लावली आग
मुंबई - मुंबईसह ठाण्यात दुचाकी जाळण्याचे सत्र सुरूच आहे. सायन येथील श्री सुंदर कमलानगरमध्ये अज्ञातांनी काल मध्यरात्री 17 दुचाकी जाळल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गाड्यांना आग लागल्याचे कळताच स्थानिकांनी त्वरित अग्निशमन दलाला बोलावलं. त्यानंतर अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांच्या सहाय्याने आग आटोक्यातआणण्यात आली. मात्र तोपर्यंत दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. ही आग कशी लागली याप्रकरणी सायन पोलीस तपास करत आहेत. मुंबईत या अगोदरही समाजकंटकांकडून वाहने जाळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे अलीकडेच ठाण्यात देखील आपापसात भांडणाचे पर्यवसन दुचाकी जळीतकांडात झाले होते. मुंबईत देखील काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारे इमारतीच्या पार्किंग प्लॉटमध्ये पार्क केलेल्या बाईक्सना आग लावण्यात आली होती.