प्रियकरानं प्रेमात दिला दगा; निराश झालेल्या प्रेयसीनं त्याच्याच घरासमोर पेटवून घेतलं अन् संपवले आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 21:15 IST2021-08-29T21:12:38+5:302021-08-29T21:15:57+5:30
Girlfriend set Fire Herself : तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

प्रियकरानं प्रेमात दिला दगा; निराश झालेल्या प्रेयसीनं त्याच्याच घरासमोर पेटवून घेतलं अन् संपवले आयुष्य
प्रियकराचा साखरपुडा झाल्याची धक्कादायक माहिती समजल्यानंतर मुंबईतील एका तरुणी रॉकेल ओतून स्वत: ला पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शेजारच्या लोकांनी तात्काळ आग विझवून पीडितेला कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलं आहे. या घटनेत पीडित तरुणी गंभीर जखमी झाली असून ९० टक्के भाजल्याने तिचा आज मृत्यू झाला. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांकडे अपमृत्यूची नोंद आहे.
२१ वर्षीय तरुणी सांताक्रूझ येथील रहिवासी आहे. जखमी तरुणी तीन वर्षांपूर्वी गुजरातमध्ये वडोदरा येथे एका लग्न समारंभासाठी गेली होती. दरम्यान तेथे तिची एका तरुणाशी ओळख झाली. यानंतर दोघांच्या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. दोघांमध्ये बातचीत वाढली. नंतर या एकमेकांत प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी लग्न करण्याचं देखील ठरवलं होतं. त्यांनी आपल्या पालकांना प्रेमसंबंधाबाबत कल्पना दिली होती. मात्र, संबंधित तरुण तरुणी दुरच्या नात्यानं एकमेकांचे भाऊ बहिण लागतात असं सांगून घरच्यांनी लग्नाला नकार दिला.
यानंतर तरुणाच्या आई-वडिलांनी आपल्या मुलासाठी एक वेगळीच मुलगी शोधली आणि पीडितेला काही न कळवता साखरपुडाही उरकून घेतला. या घटनेची माहिती मिळताच पीडित तरुणीने आपल्या प्रियकराच्या घरी सात रस्ता याठिकाणी जाऊन गोंधळ घातला. आरडाओरडा केल्यानंतर संबंधित तरुणी प्रियकारच्या घरात जाऊन घरातील रॉकेलचं कॅन घेत त्यातील रॉकेल अंगावर ओतून घेत. तरुणीनं स्वत:ला पेटवून घेतलं आहे. आजूबाजूच्या लोकांनी आग विझवली आणि तरुणीला उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलं. मात्र दुर्दैवाने तिचा आज मृत्यू झाला.