शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

जिला नणंद समजली ती निघाली नवऱ्याची 'बायको'; लग्नाच्या नावाखाली १.५३ कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 10:36 IST

विजय राज गौडा नावाच्या व्यक्तीने २९ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर नव्या श्री हिची लग्नाचं आमिष दाखवून १.५३ कोटी रुपयांची फसवणूक केली.

बंगळुरूमध्ये एका मॅट्रिमोनिअल वेबसाईटच्या माध्यमातून फसवणुकीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. करोडपती बिझनेसमन आहे असं सांगणाऱ्या विजय राज गौडा नावाच्या व्यक्तीने २९ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर नव्या श्री हिची लग्नाचं आमिष दाखवून १.५३ कोटी रुपयांची फसवणूक केली. आरोपी विजय राज गौडा हा आधीच विवाहित आहे. त्याने केवळ लग्नाचं आमिष दाखवून पीडिता आणि तिच्या कुटुंबाकडून मोठी रक्कम उकळली. त्याने आपल्या पत्नीला आणि वडिलांना या संपूर्ण कटात सामील करून घेतले.

मार्च २०२४ मध्ये, व्हाईटफिल्ड येथील रहिवासी असलेल्या नव्या श्रीची ओळख 'ओक्कालिगा' या वेबसाईटच्या माध्यमातून विजय राज गौडा उर्फ विजय बी याच्याशी झाली. विजयने स्वतःला 'व्हीआरजी एंटरप्राइजेस'चा मालक असल्याचं सांगितलं. तसेच बंगळुरूच्या राजाजीनगर आणि सदाशिवनगर भागात आपले क्रशर, लॉरी, जमीन आणि निवासी मालमत्ता असल्याचं भासवलं.

नव्याचा विश्वास संपादन केला

२०१९ च्या ईडी प्रकरणाशी संबंधित जामीन आदेशाची एक प्रतही दाखवली आणि आपल्याकडे ७१५ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचा दावा करून नव्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने नव्या श्रीच्या कुटुंबाला आपल्या व्यवसायात लाखो रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले आणि त्यांच्याकडून कर्जही घेतले. बँक खात्यात तांत्रिक अडचण असल्याचं कारण सांगून विजयने ४ एप्रिल रोजी नव्याकडून १५,००० रुपये उसने घेतले. त्यानंतर, त्याने नव्याला एकत्र व्यवसाय करण्याच्या नावाखाली मित्रांकडून कर्ज घेण्यास आणि पैसे उधार घेण्यास तयार केलं.

कुटुंबाचीही करून दिली ओळख 

विजयने केंगेरी मेट्रो स्टेशनवर आपल्या कुटुंबाची ओळख करून दिली. यामध्ये त्याचे वडील कृष्णप्पा बी गौडा, बहीण सुशीदीपा के गौडा उर्फ सौम्या आणि आई नेत्रावती के गौडा यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, त्याने आपल्या पत्नीची ओळख 'बहीण' म्हणून करून दिली. त्याच्या वडिलांनी आपण निवृत्त तहसीलदार असल्याचं सांगितलं आणि 'व्हीआरजी एंटरप्राइजेस'चे चेक देऊन पेमेंटची खात्री दिली.

असं समजलं सत्य

एफआयआरनुसार (FIR), विजयने नव्याच्या मित्रांनाही गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित केलं, ज्यातून त्यांनी ६६ लाख आणि २३ लाख रुपये गुंतवले. डिसेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान, नव्याच्या वडिलांनी १०.५ लाख रुपये आणि तिच्या आईने आपल्या निवृत्ती निधीतील १८ लाख रुपये दिले. जेव्हा नव्या कर्जाचे पैसे परत मागण्यासाठी विजयच्या घरी गेली, तेव्हा तिला सत्य समजलं.

नणंदच होती पत्नी

विजय हा आधीच विवाहित असल्याचं तिला कळलं. ज्या मुलीला ती आपली 'नणंद' समजत होती, ती प्रत्यक्षात तिच्या होणाऱ्या पतीची पत्नी निघाली. आरोपी विजयच्या पत्नीसह त्याचे संपूर्ण कुटुंब या वैवाहिक आणि गुंतवणूक फसवणुकीत सामील होतं. सध्या विजय, त्याचे वडील आणि पत्नी यांच्याविरुद्ध फसवणूक, गुन्हेगारी कट रचणं आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Woman Duped of Millions in Marriage Scam; Sister-in-Law Was Wife

Web Summary : A Bengaluru woman was defrauded of ₹1.53 crore by a man posing as a wealthy businessman on a matrimonial site. He falsely presented his wife as his sister and involved his entire family in the scam, promising marriage and business ventures before disappearing with the money.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसmarriageलग्नMONEYपैसाBengaluruबेंगळूर