टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 19:17 IST2025-07-02T19:14:15+5:302025-07-02T19:17:49+5:30
एका नामांकित आयटी कंपनीमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या इंजिनियरला एका महिलेचा टॉयलेटमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
बंगळुरू शहरातील एका नामांकित आयटी कंपनीमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या इंजिनियरला एका महिलेचा टॉयलेटमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आरोपीचं नाव नागेश स्वप्निल माळी असून, तो इन्फोसिसमध्ये सीनियर असोसिएट पदावर कार्यरत होता.
महिलेच्या सतर्कतेमुळे उघड झाली विकृती
संबंधित महिला टॉयलेटमध्ये असताना तिला शेजारच्या कॅबिनमधून काही संशयास्पद हालचाली जाणवल्या. तिने बारकाईने पाहिल्यावर लक्षात आलं की, कुणीतरी तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करत आहे.
या प्रकाराबाबत शंका येताच तिने आरडाओरड केली आणि मदतीसाठी इतरांना हाक मारली. आवाज ऐकून ऑफिसमधील इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी नागेशला पकडून ठेवले.
फोनमध्ये सापडला व्हिडीओ
कर्मचाऱ्यांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिल्यानंतर पोलिसांनी नागेशचा फोन तपासला. त्यात संबंधित महिलेचा व्हिडीओ आढळून आला. तो व्हिडीओ महिलेच्या उपस्थितीत डिलिटही करण्यात आला. मात्र, पोलिसांनी आरोपीचा मोबाईल फॉरेन्सिक तपासासाठी पाठवला असून, आरोपीने यापूर्वीही अन्य महिलांचे व्हिडीओ शूट केले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, नागेश माळीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.