माजी नौसैनिक बनला हैवान, प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ५ महिलांवर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 22:12 IST2022-01-11T22:11:34+5:302022-01-11T22:12:38+5:30

Rape Case :एका पीडितेने सांगितले की, रॉडवेलच्या चेहऱ्यावर टॅटू आहेत, जसे राक्षसाच्या चेहऱ्यावर असतात. दुसरी पीडित महिला म्हणाली, 'मला वाटलं की तो मला मारेल, कारण त्याने कोणाला तरी मारलं होतं.'

Beast becomes ex-navy man, caught in love trap and raped 5 women | माजी नौसैनिक बनला हैवान, प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ५ महिलांवर केला बलात्कार

माजी नौसैनिक बनला हैवान, प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ५ महिलांवर केला बलात्कार

एका व्यक्तीने पहिल्यांदा ५ महिलांशी डेटिंग App टिंडरवर चॅट केले. नंतर प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. या सर्व महिलांवर त्याने लैंगिक अत्याचार केले. हद्द इतकी पार केली की, त्याने त्याच्या तीन विद्यार्थींना आपले भक्ष्य बनवले. या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

'द सन'च्या वृत्तानुसार, ही व्यक्ती ब्रिटनची रहिवासी आहे. ज्याने रॉयल नेव्हीमध्ये नोकरी केली आहे. 31 वर्षीय टॉम रॉडवेल असे त्याचे नाव आहे. टॉमला बलात्काराच्या ११ घटनांमध्ये दोषी ठरविले. शारीरिक संबंध ठेवताना तो हिंसक व्हायचा. एका महिलेवर बलात्कार केल्यानंतर तिने एक मेसेजही केला होता, ज्यामध्ये तिने लिहिले होते की, 'मी तुझ्यावर पुन्हा बलात्कार करायला कधी येऊ? 



एका पीडितेने सांगितले की, रॉडवेलच्या चेहऱ्यावर टॅटू आहेत, जसे राक्षसाच्या चेहऱ्यावर असतात. दुसरी पीडित महिला म्हणाली, 'मला वाटलं की तो मला मारेल, कारण त्याने कोणाला तरी मारलं होतं.'

टीसाईड क्राउन कोर्टात आरोपीविरुद्धच्या खटल्याची सुनावणी झाली असता, पीडित तिन्ही महिला त्याच्या विद्यार्थिनी असल्याचे आढळून आले. मिडल्सब्रो येथे राहणारा रॉडवेल महसूल आणि सीमाशुल्क विभागात कार्यरत होता. त्यापूर्वी त्यांनी नौदलातही काम केले होते. सुनावणीदरम्यान त्याचे वर्णन 'खतरनाक व्यक्ती' असे केले गेले.

Web Title: Beast becomes ex-navy man, caught in love trap and raped 5 women