सिलिंडर चोरुन पळणाऱ्या चोरांना लागली डुलकी; शेतात झोपलेले असतानाच गावकऱ्यांनी पकडलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 12:43 IST2026-03-17T12:42:24+5:302026-03-17T12:43:39+5:30

एका सरकारी शाळेतून मिड-डे मीलचा गॅस सिलिंडर चोरीला गेला.

barabanki thief arrested stealing gas cylinder from school villagers caught while sleeping in field | सिलिंडर चोरुन पळणाऱ्या चोरांना लागली डुलकी; शेतात झोपलेले असतानाच गावकऱ्यांनी पकडलं अन्...

सिलिंडर चोरुन पळणाऱ्या चोरांना लागली डुलकी; शेतात झोपलेले असतानाच गावकऱ्यांनी पकडलं अन्...

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका सरकारी शाळेतून मिड-डे मीलचा गॅस सिलिंडर चोरीला गेला. आश्चर्याची बाब म्हणजे चोरी केल्यानंतर आरोपींनी पळ काढण्याऐवजी जवळच झोपणं पसंत केलं आणि सकाळी एक चोर सिलिंडर लपवताना पकडला गेला. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याचा साथीदार सध्या फरार आहे.

बाराबंकीच्या दरियाबाद कोतवाली परिसरातील सराय शाह आलम गावात ही घटना घडली. चोरांनी सरकारी शाळेच्या स्वयंपाकघराचं कुलूप तोडून  मिड-डे मीलसाठी वापरला जाणारा एलपीजी सिलिंडर चोरला. मिळालेल्या माहितीनुसार, गावचे सरपंच फुरकान अहमद सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले होते. त्याच वेळी त्यांना मोहरीच्या शेतात एक तरुण संशयास्पद रितीने सिलिंडर लपवताना दिसला. 

संशय आल्याने त्यांनी त्याचा पाठलाग केला आणि जवळच्या प्राथमिक शाळेची पाहणी केली असता, स्वयंपाकघराचं कुलूप तुटलेलं आढळलं. त्यानंतर फुरकान अहमद यांनी घटनास्थळावरून गयास नावाच्या तरुणाला पकडलं आणि तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरू केली.

चौकशी दरम्यान आरोपी गयासने सांगितलं की, तो त्याचा साथीदार लवकुश याच्यासोबत चोरी करण्यासाठी आला होता. लवकुश सिलिंडर घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला होता, परंतु गावकऱ्यांना घाबरून त्याने सिलिंडर मोहरीच्या शेतात लपवून ठेवला होता. पोलिसांनी शेतातून चोरीचा सिलिंडर जप्त केला आहे.

दरियाबाद कोतवालीचे प्रभारी धर्मेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गयासला अटक करून त्याची जेलमध्ये रवानगी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या चोरीत सामील असलेल्या लवकुश या दुसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे. जिल्ह्यात सिलिंडरच्या टंचाईमुळे अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचंही समोर आलं आहे.

Web Title : सिलिंडर चुराकर भाग रहे चोरों को आई नींद, ग्रामीणों ने पकड़ा!

Web Summary : उत्तर प्रदेश में स्कूल से गैस सिलिंडर चुराकर चोर पास ही सो गए। ग्रामीणों ने उन्हें पकड़ लिया। एक चोर गिरफ्तार, दूसरा फरार। खेत से चोरी का सिलिंडर बरामद।

Web Title : Thieves Stealing Cylinder Fall Asleep; Villagers Catch Them!

Web Summary : In Uttar Pradesh, thieves stole a gas cylinder from a school. They fell asleep nearby and were caught by villagers. One thief is arrested, and the other is at large. Stolen cylinder recovered from field.