शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; २६ जणांना अटक, ३ जण अजूनही फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 11:48 IST

Baba Siddique Murder Case : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखा लवकरच आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत आहे.

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखा लवकरच आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणाचा तपास करणारे मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी काही दिवसांत आरोपपत्र दाखल करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी एकूण २६ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, ज्यामध्ये शुभम लोणकर, झिशान अख्तर आणि लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई अशी तीन आरोपींना फरार घोषित करण्यात येणार आहे. मुंबई गुन्हे शाखेला हत्येमागील कारणाबाबत अद्याप ठोस काहीही सापडलं नसल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. मुंबई गुन्हे शाखेने एसआरए वादाच्या अँगलनेही तपास केला परंतु पोलिसांना असं काही सापडलेलं नाही.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी हे अभिनेता सलमान खानच्या जवळचे होते. मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना हत्येमागचं नेमकं कारण माहीत नाही. त्यांना फक्त हत्या करा इतकंच सांगण्यात आलं होतं. तसेच त्याबदल्यात पैसे मिळतील असंही सांगितलं होतं. 

या प्रकरणातील फरार आरोपी शुभम लोणकर आणि झिशान अख्तर यांना अटक होईपर्यंत हत्येमागचं नेमकं कारण समोर येणार नसल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईतील वांद्रे येथे बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दसऱ्याच्या दिवशी त्यांची हत्या करण्यात आली. गोळी लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांच्या पथकाने त्यांना मृत घोषित केलं. 

टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस