हृदयद्रावक! आईला शेवटचा कॉल, पत्नीला पाठवलं लोकेशन; SBI मॅनेजरने नदीत मारली उडी अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:31 IST2026-01-02T12:29:05+5:302026-01-02T12:31:06+5:30
आपल्या आईशी संवाद साधला, त्यानंतर पत्नीला स्वतःचं 'लास्ट लोकेशन' पाठवलं आणि फोन स्विच ऑफ केला.

फोटो - nbt
उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यात हृदयद्रावक घटना समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एका ब्रांच मॅनेजरने सरयू नदीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना अयोध्या कोतवाली क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोरखपूर-अयोध्या हायवेवरील सरयू पुलावर घडली. पोलिसांनी रात्री नदीतून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
रामबाबू सोनी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. ते गोंडा जिल्ह्यातील मनकापूर क्षेत्रातील जवाहर नगरचे रहिवासी होते आणि सध्या बहराइच जिल्ह्यात एसबीआयच्या एका ब्रांच मॅनेजर म्हणून कार्यरत होते. नातेवाईक आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामबाबू सोनी गेल्या अनेक दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होते. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास रामबाबू सरयू नदीच्या पुलावर पोहोचले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी सर्वप्रथम कुटुंबीयांशी फोनवर संवाद साधला. शेवटच्या क्षणी त्यांनी आपल्या आईशी संवाद साधला, त्यानंतर पत्नीला स्वतःचं 'लास्ट लोकेशन' पाठवलं आणि फोन स्विच ऑफ केला. यानंतर पाठीवरील बॅग न काढता त्यांनी थेट सरयू नदीत उडी घेतली. भरदिवसा पुलावर गर्दी असल्याने लोकांनी त्यांना पाहताच पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी गोताखोरांच्या मदतीने शोधमोहीम राबवली आणि रात्री ८ च्या सुमारास त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या बॅगेत मोबाईल, औषधे आणि काही कागदपत्रे होती, ज्यावरून त्यांची ओळख पटली. अयोध्या कोतवालीचे प्रभारी निरीक्षक पंकज सिंह यांनी सांगितलं की, ३१ डिसेंबरला रामबाबू बँकेत गेले नव्हते. बुधवारी सकाळी औषधं घेण्याच्या बहाण्याने ते घरातून बाहेर पडले होते. त्यांच्या भावाने सांगितले की, रामबाबू यांना डोकेदुखीचा जुना त्रास होता आणि त्यासाठी ते नियमित उपचार घेत होते.