शौचास जात असताना महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; ९० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 20:22 IST2021-08-15T20:22:05+5:302021-08-15T20:22:34+5:30

Attempting to burn a woman alive :महिलेला जिवंत जाळल्याची माहिती मिळताच एसपी सुधा सिंग हे रुग्णालयात पोहोचले असून त्यांनी पीडितेचा जबाब नोंदवला.

Attempting to burn a woman alive while going to the toilet; 90 percent burns are serious | शौचास जात असताना महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; ९० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर

शौचास जात असताना महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; ९० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर

ठळक मुद्देप्रकृती गंभीर असल्याने झांसी मेडिकल रुग्णायालात पाठवण्यात आले. घटनास्थळी पोलीस दाखल होईपर्यंत आरोपी फरार झाला होता. 

उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातून छेडछडीने पीडित महिलेसोबत अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेला आरोपी तरुणाच्या कुटुंबीयांनी जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना ठठेवरा गावातील आहे. पीडिता ९० टक्के भाजली आहे. पोलिसांनी भाजलेल्या महिलेला उपचारासाठी महोबा जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने झांसी मेडिकल रुग्णायालात पाठवण्यात आले. घटनास्थळी पोलीस दाखल होईपर्यंत आरोपी फरार झाला होता. 

पोलीस सुजान अब्दुल्लाने पीडित महिलेचा जबाब नोंदवला असून पीडितेच्या कुटुंबीय दहशतीखाली आहे. कुलपहाड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठठेवरा गावातील जालिम सिंह याची पत्नी विनीता हिने गावात राहणाऱ्या कल्लूच्या विरोधात पोलीस ठाण्यात छेडछाडीची तक्रार केली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी गावातून फरार झाला. आपल्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे संतापलेल्या आरोपीच्या आई-वडिलांनी रविवारी सकाळी शौचासाठी जात असताना विनीता हिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर तातडीन महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि पोलिसांना याची सूचना मिळताच मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. महिलेची प्रकृती गंभीर असून तिला मोठ्या रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. आरोपीच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

महिलेला जिवंत जाळल्याची माहिती मिळताच एसपी सुधा सिंग हे रुग्णालयात पोहोचले असून त्यांनी पीडितेचा जबाब नोंदवला. त्याशिवाय फरार झालेल्या आरोपीला तातडीने पकडण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण आहे. त्याशिवाय गावात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.

Web Title: Attempting to burn a woman alive while going to the toilet; 90 percent burns are serious