Attack on police Yerawada jail | येरवडा कारागृहाच्या बाहेर पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला
येरवडा कारागृहाच्या बाहेर पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला

पुणे : गुन्हेगाराला येरवडा कारागृहातून वर्ग करुन घेण्याकरिता आलेल्या अहमदनगर येथील एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला. ही घटना १४ ऑगस्ट रोजी येरवडा कारागृहाबाहेर घडली. याप्रकरणी आसिफ सलिम पटेल(32,रा.दत्तवाडी) याला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. 
फिर्यादी हरिश पानसंबळ(रा.श्रीरामपूर) हे अहमदनगर पोलीस स्टेशन येथे शिपाई पदावर काम करतात.  ते येरवडा करागृहातील वसीम सलीम पटेल उर्फ दरवेशी याला अहमदनगर येथे दाखल असलेल्या एका गुन्हयात वर्ग करुन घेण्यासाठी आले होते. ते येरवडा कारागृहाच्या बाहेर त्यांच्या सहकाऱ्यासह थांबले होते. यावेळी वसीम पटेलचा भाऊ आरोपी आसिफ हा तेथे आला. त्याने फिर्यादीला माझ्या भावाला जेवण आणले आहे, तुम्ही जेवण द्या असा म्हणाला. मात्र फिर्यादीने त्यास नकार दिला. यातच आसिफ याच्यावरही अहमदनगर पोलीस ठाण्यात फटाके वाजवल्याचा गुन्हा दाखल आहे. या दोन्हीचा राग मनात ठेऊन आसिफने फिर्यादीवर हल्ला करुन मारहाण केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी आसिफला अटक केली आहे.  


Web Title: Attack on police Yerawada jail
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.