शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानचे माजी मंत्री जसवंत यादव यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला

By पूनम अपराज | Updated: January 24, 2021 21:00 IST

Crime News : भाजप नेते मोहित यादव यांच्यावर डझनहून अधिक अज्ञात इसमांनी हल्ला केला. यानंतर जखमी मोहित यादवला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देभाजप नेते मोहित यादव यांच्यावर डझनहून अधिक अज्ञात इसमांनी हल्ला केला. यानंतर जखमी मोहित यादवला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

अलवर - रविवारी अलवर जिल्ह्यातील बहरोड़ पोलीस ठाण्याअंतर्गत एक मोठी घटना घडली. येथे भाजप नेते मोहित यादव यांच्यावर डझनहून अधिक अज्ञात इसमांनी हल्ला केला. यानंतर जखमी मोहित यादवला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

असे सांगितले जात आहे की, बर्डोदजवळील बेरापूरच्या ढाण्याजवळून बहरोड़ला जाणाऱ्या मोहित यादव यांना त्यांच्या गाडीच्या समोर १२-१३ जण आले आणि थांबवले. त्यानंतर त्यांच्यावर लाठी हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी कारचा काचादेखील तोडला आहे. घटनेची माहिती मिळताच बहरोड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकरणाचा तपास करत आहेत.जवळपासचे लोक रुग्णालयात पोहोचलेमोहित यादव हे माजी मंत्री जसवंत यादव यांचे पुत्र आहेत. मोहित यांनी भाजपाच्या तिकिटावर बहोरहून विधानसभा निवडणूक लढविली. मोहित यादव म्हणाले की, गाडी पुढे थांबवल्यानंतर जमावाने लाठी आणि काठीने हल्ला केला आहे. १२-१३ लोकांनी हा हल्ला केला आहे. यानंतर आजूबाजूच्या भागातील लोक त्यांच्यापर्यंत रूग्णालयात पोहोचले आहेत. ते म्हणाले की, ज्या लोकांनी यादव यांच्यावर हल्ला केला त्या हल्लेखोरांबद्दल काही कल्पना नाही. त्यामुळे अज्ञात लोकांविरूद्ध पोलिस ठाण्यात अहवाल दाखल करण्यात येणार आहे.

मागील काही दिवसांमध्ये बहरोड भागातील आमदार बलजित यादव आणि मोहित यांच्यात सोशल मीडियावर परस्पर विरोधी रणधुमाळी सुरू होती. यावेळी बलजित यादव आणि मोहित यादव यांचे वडील, माजी मंत्री जसवंत यादव यांच्यात एकमेकांना शह देणारा लढा देण्याचे आव्हान केले गेले. त्यानंतर बलजित यादव स्वत: लाठी घेऊन बहरोड येथील स्टेडियमवर पोहोचले, पण जसवंत यादव पोहोचले नाहीत. हा हल्ला काही राजकीय प्रतिस्पर्धेमुळे झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पण आता हल्ल्याबाबत कोणताही कोणावर थेट आरोप किंवा आरोप- प्रत्यारोप मोहित यादव यांनी केलेला नाही.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिसBJPभाजपा