Attack on former Rajasthan minister Jaswant Yadav's son in Rajasthan | राजस्थानचे माजी मंत्री जसवंत यादव यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला

राजस्थानचे माजी मंत्री जसवंत यादव यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला

ठळक मुद्देभाजप नेते मोहित यादव यांच्यावर डझनहून अधिक अज्ञात इसमांनी हल्ला केला. यानंतर जखमी मोहित यादवला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

अलवर - रविवारी अलवर जिल्ह्यातील बहरोड़ पोलीस ठाण्याअंतर्गत एक मोठी घटना घडली. येथे भाजप नेते मोहित यादव यांच्यावर डझनहून अधिक अज्ञात इसमांनी हल्ला केला. यानंतर जखमी मोहित यादवला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

असे सांगितले जात आहे की, बर्डोदजवळील बेरापूरच्या ढाण्याजवळून बहरोड़ला जाणाऱ्या मोहित यादव यांना त्यांच्या गाडीच्या समोर १२-१३ जण आले आणि थांबवले. त्यानंतर त्यांच्यावर लाठी हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी कारचा काचादेखील तोडला आहे. घटनेची माहिती मिळताच बहरोड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकरणाचा तपास करत आहेत.

जवळपासचे लोक रुग्णालयात पोहोचले
मोहित यादव हे माजी मंत्री जसवंत यादव यांचे पुत्र आहेत. मोहित यांनी भाजपाच्या तिकिटावर बहोरहून विधानसभा निवडणूक लढविली. मोहित यादव म्हणाले की, गाडी पुढे थांबवल्यानंतर जमावाने लाठी आणि काठीने हल्ला केला आहे. १२-१३ लोकांनी हा हल्ला केला आहे. यानंतर आजूबाजूच्या भागातील लोक त्यांच्यापर्यंत रूग्णालयात पोहोचले आहेत. ते म्हणाले की, ज्या लोकांनी यादव यांच्यावर हल्ला केला त्या हल्लेखोरांबद्दल काही कल्पना नाही. त्यामुळे अज्ञात लोकांविरूद्ध पोलिस ठाण्यात अहवाल दाखल करण्यात येणार आहे.

मागील काही दिवसांमध्ये बहरोड भागातील आमदार बलजित यादव आणि मोहित यांच्यात सोशल मीडियावर परस्पर विरोधी रणधुमाळी सुरू होती. यावेळी बलजित यादव आणि मोहित यादव यांचे वडील, माजी मंत्री जसवंत यादव यांच्यात एकमेकांना शह देणारा लढा देण्याचे आव्हान केले गेले. त्यानंतर बलजित यादव स्वत: लाठी घेऊन बहरोड येथील स्टेडियमवर पोहोचले, पण जसवंत यादव पोहोचले नाहीत. हा हल्ला काही राजकीय प्रतिस्पर्धेमुळे झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पण आता हल्ल्याबाबत कोणताही कोणावर थेट आरोप किंवा आरोप- प्रत्यारोप मोहित यादव यांनी केलेला नाही.

 

Web Title: Attack on former Rajasthan minister Jaswant Yadav's son in Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.