Ashish Shelar : भाजपा आमदार आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 10:21 AM2022-01-08T10:21:28+5:302022-01-08T10:22:13+5:30

Ashish Shelar : आशिष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना काल पत्र लिहून तक्रार केली असून सदर दोन्ही मोबाईल नंबरची माहिती देऊन याबाबत तपास करण्याची विनंती केली आहे.

Ashish Shelar: BJP MLA Ashish Shelar threatened with death along with his family; Complaint to Mumbai Police Commissioner | Ashish Shelar : भाजपा आमदार आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार

Ashish Shelar : भाजपा आमदार आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार

googlenewsNext

मुंबई :  भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आशिष शेलार यांना सतत दोन वेगवेगळ्या  मोबाईल नंबरवरून धमकी देण्यात येत आहे. शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी एक अज्ञात इसम देत असून अत्यंत अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत असल्याची माहिती समोर आली आहे. 

या प्रकरणी आशिष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना काल पत्र लिहून तक्रार केली असून सदर दोन्ही मोबाईल नंबरची माहिती देऊन याबाबत तपास करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, यापूर्वी  2020 मध्ये अशाच प्रकारे धमकी देणाऱ्याला वांद्रे पोलिसांनी मुंब्रा येथून अटक केली होती. तर याआधी अतिरेक्यांकडे आमदार आशिष शेलार यांच्यासह अन्य दोन हिंदुत्ववादी व्यक्तींची रेकी केल्याची माहिती सापली होती. 

आता पुन्हा अतिरेक्यांकडून नागपूरात संघ मुख्यालयाची रेकी करण्यात आल्याचे उघड झाले. याच दरम्यान गेले दोन दिवस आशिष शेलार यांना धमकीचे फोन येत असल्याने ही बाब गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून आशिष शेलार हे आलेल्या धमकीची माहिती देण्यात येणार असल्याचे समजते.

Web Title: Ashish Shelar: BJP MLA Ashish Shelar threatened with death along with his family; Complaint to Mumbai Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.