शिक्षकाच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याला आला अर्धांगवायूचा झटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 16:26 IST2018-11-12T16:25:44+5:302018-11-12T16:26:08+5:30

गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षकाची अमानुष मारहाण; विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका आल्याचा पालकांचा आरोप

Arthagavu jolt came to the student due to the beat of a teacher | शिक्षकाच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याला आला अर्धांगवायूचा झटका 

शिक्षकाच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याला आला अर्धांगवायूचा झटका 

पुणे - पुण्यातील एसएसपीएमएस श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलीटरी स्कूल या शाळेतील विद्यार्थ्याला शिक्षकाकडून झालेल्या अमानुष मारहाणीत मुलाला अर्धांगवायूचा झटका आल्याचा आरोप मुलाच्या पालकांनी केला आहे.

प्रसन्न शैलेंद्र पाटील असं विद्यार्थ्यांचे नाव असून तो मूळचा इंदापूर तालुक्यातील रहिवास आहे.तो एसएसपीएमएस या शाळेत प्रसन्न इयत्ता 6 वीच्या वर्गात शिकतो व याच शाळेच्या वसतिगृहात राहतो. दिवाळीच्या सुट्ट्यांपूर्वी शाळेतील अभ्यासक्रमाची चित्रकलेच्या विषयाची पूर्ण न केल्याने शाळेतील शिक्षक संदीप गाडे यांनी विद्यार्थ्याला मारहाण केली होती. हा प्रकार विद्यार्थ्याने भीतीपोटी कोणालाही सांगितला नाही. सुट्ट्या लागल्यानंतर त्याच्या पालकांना मुलाच्या चेहऱ्यात काही बदल झालेला दिसून आला. त्यांना त्याला  दवाखान्यात नेल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

दरम्यान, शाळेत असतानाच विद्यार्थ्याला त्रास होत होता. मात्र, शाळा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले असा आरोपही पालकांनी केला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता पाटील यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पालक आज शाळेत दाखल झाले आहेत. याबाबत गुन्हा दाखल करणार असल्याचे पालकांनी स्पष्ट केले आहे.

 

Web Title: Arthagavu jolt came to the student due to the beat of a teacher