शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

घरफोड्या करणाऱ्या सराईत टोळीला अटक; २५ गुन्हे उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 1:31 PM

पुणे शहर, ग्रामीण, सोलापूर, ठाणे पोलीस हद्दीत घरफोड्या, दरोडे घातल्याची कबुली दिली..

ठळक मुद्दे२६ लाख ४४ हजारांचा ऐवज जप्त : अल्पवयीन मुलावर ३५ गुन्हे

पुणे : पुणे शहरासह पुणे जिल्हा आणि सोलापूर, ठाण्यात घरफोड्यासह १५० पेक्षा अधिक गुन्हे करणाऱ्या सराईत टोळीला येरवडा  पोलिसांनी अटक केली . त्यांच्या ताब्यातून ४ मोटारी, ५ दुचाकी, १०० ग्रॅम सोन्याचे दागिने, कोयता, मिरची पूड, कटावणी असा मिळून २६ लाख ४४ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.सूरजितसिंग राजपालसिंग टाक (वय ३०, रा. हडपसर), गोगलिंसग बादलसिंग कल्याणी (वय ४७, रा. रामटेकडी, हडपसर), बिंतुसिंग शामसिंग कल्याणी (वय २३, रा. रामटेकडी, हडपसर ) अशी अटक केलेल्यांची नावे असून एका एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे़ त्यांच्याकडून २५ गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्यावर आतापर्यंत एकूण १५० हून अधिक चोरी, घरफाडी, दरोडा, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत़. याबाबत पोलिसांनी सांगितले की,  येरवड्यातील घरफोडीच्या घटनेचा तपास करताना आरोपी मोटारीतून येरवड्यातील एटीएम मशीनवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यातील  तिघे फरारी झाले.  त्यांच्या माहितीनुसार पोलिसांनी दुसऱ्या  दिवशी बिंतुसिंग कल्याणी आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता येरवड्यातील एका एटीएम मशीनवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्याकडील मोटारीमध्ये घातक हत्यारे आणि दरोड्याचे साहित्य मिळून आले. अधिक चौकशीत त्यांनी पुणे शहर, ग्रामीण, सोलापूर, ठाणे पोलीस हद्दीत घरफोड्या, दरोडे घातल्याची कबुली दिली. अटक केलेले तिघेही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध वाहनचोरी, जबरी चोरी, मारामारी, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न असे विविध गुन्हे दाखल आहेत. त्यांनी येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २ मोटार चालकांना हत्याराचा धाक दाखवून मोटारी चोरुन नेल्या होत्या. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी बिबवेवाडी १०, येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८, हडपसर, चिखली, पिपंरी , फरासखाना, वानवडी, लोणी काळभोरमधील प्रत्येकी एक गुन्हा मिळून २५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. हे चोरटे दरोडा घालण्यापूर्वी घरांची रेकी करत होती. त्यानंतर कटरच्या साह्याने बंद घराचा कोंयडा तोडूने घरात प्रवेश करत होते. घरातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोख रकमेसह ऐवज घेऊन फरार होत होते. .......अल्पवयीन मुलावर ३५ गुन्हेया तिघांबरोबर असलेल्या अल्पवयीन मुलावर तब्बल ३५ गुन्हे दाखल आहेत. मागील ४ ते ५ वर्षांपासून त्याने गुन्हे करण्यास सुरुवात केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तर अटक केलेली सराईत टोळी १५ ते १८ वर्षांपासून चोºया करीत असल्याचे उघड झाले आहे. ............१० गुन्ह्यात होता फरारीया तिघा चोरट्यांपैकी बिंतुसिंग शामसिंग कल्याणी हा बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ९ व चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अशा १० गुन्ह्यात फरारी होता़ही कामगिरी पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानुरु, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, सहायक फौजदार बाळासाहेब बहिरट, रमेश ओव्हाळ, खिस्त्रोपर मकासरे, हणमंत जाधव, संदीप मांजूळकर, पंकज मुसळे, अशोक गवळी, मनोज कुदळे, मोहिते, समीर भोरडे, अजय पाडोळे, राहूल परदेशी, सुनील सकट, सुनील नागलोत, विष्णू सरोदे, कुंवर यांच्या पथकाने केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिस