शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
4
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
5
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
6
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
7
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
8
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
9
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
10
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
11
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
12
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
13
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
14
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
15
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
16
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
17
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
18
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
19
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
20
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात लिपिकाला लाच घेतल्याप्रकरणी रंगेहाथ अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 22:51 IST

विभागात बाहेरुन वेगवेगळ्या कामासाठी येणाऱ्या लोकांकडून काम होण्यासाठी लाच घेतली जाते. अशा लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचून पकडलेही जाते.

 

पुणे : विभागात बाहेरुन वेगवेगळ्या कामासाठी येणाऱ्या लोकांकडून काम होण्यासाठी लाच घेतली जाते. अशा लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचून पकडलेही जाते. पण, आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एक वेगळा सापळा रचला होता. तोही एका लिपिकाच्या तक्रारीवरुन दुसऱ्या लिपिकाला लाच घेताना पकडण्यात आले. ही कारवाई पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता येथे करण्यात आली. निलेश वसंत मोडक (वय ३८, प्रथम लिपिक, कार्यकारी अभियंता, पाटबंधारेविभाग) असे अटक केलेल्या लिपिकाचे नाव आहे.

पाटबंधारे कार्यालयातील लिपिक म्हणून काम करणाऱ्या एका लिपिकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यांच्याकडे असणारी शासकीय कामे प्रलंबित ठेवली म्हणून तक्रारदार यांचा कसूरी अहवाल पाठवून तक्रारदार यांच्यावर वरिष्ठांकडून गंभीर कारवाई करायला लावू असे निलेश मोडक याने सांगितले होते. गंभीर कारवाई होऊ न देण्यासाठी मोडक याने २हजार रुपयांची लाच मागितली होती.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची गुरुवारी पडताळणी केली. त्यात मोडक याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पाटबंधारे विभागात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून २ हजार रुपये स्वीकारताना मोडक याला रंगेहाथ पकडण्यात आले. बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिस