शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

Video : देवदूत! धावत्या रेल्वेच्या बोगीतून खाली लटकलेल्या प्रवाशाचे पोलिसांनी वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 3:48 PM

Railway Incident Of nashik : धावत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या वृद्ध प्रवाशाला रेल्वे अपघातापासून रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून जीवनदान दिले आहे. या थरारक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज लोकमतच्या हाती लागले आहे. 

ठळक मुद्देफलाट आणि बोगीच्या पायरीवर हा प्रवासी लटकलेल्या अवस्थेत रेल्वेसोबत घसरत असल्याचे येथे बंदोबस्तावर असलेले रेल्वे पोलीस कर्मचारी इमरान कुरेशी व राकेश शेडमाके यांच्या लक्षात आले.

नाशिक : भारतीय रेल्वेत पॉइंटमन म्हणून कार्यरत असलेल्या मयूर शेळके यांनी प्रसंगावधान दाखवत चिमुकल्याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावरील ही घटना आहे. शेळके यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मुलाचा जीव वाचवला. विशेष म्हणजे अवघ्या काही सेकंदांनी मुलाचा जीव वाचला. शेळके यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलाचा जीव वाचवला. त्यांच्या या धाडसाचं अधिकाऱ्यांपासून रेल्वे मंत्र्यांपर्यंत सर्वांनी कौतुक केलं आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीदेखील त्यांच्या धाडसाचं कौतुक करत त्यांच्यावर आपल्याला अभिमान असल्याचं म्हटलं. तसाच काहीसा थरारक प्रकार नाशिक रोड रेल्वे स्थानकावर घडला आहे. धावत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या वृद्ध प्रवाशाला रेल्वे अपघातापासून, विशेष म्हणजे रेल्वेखाली जाता जाता रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून जीवनदान दिले आहे. या थरारक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज लोकमतच्या हाती लागले आहे. 

नाशिक रोड रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक-2 वर उत्तर प्रदेश येथून आलेली गोदान एक्सप्रेस ही मुंबईकडे जात होती. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर थांबा घेतल्यानंतर एक्सप्रेस पुन्हा मुंबईच्या दिशेने वेग घेत होती. दरम्यान त्या रेल्वेतील एक वृद्ध प्रवासी बाटलीत पाणी घेण्यासाठी स्थानकावर उतरला होता. रेल्वे सुरू झाल्याचे बघून हा प्रवासी फलाटावरुन धावत सुटला बोगीत चढण्याच्या प्रयत्नात असताना त्याचा पाय सटकला आणि तो धावत्या रेल्वेला लटकला. फलाट आणि बोगीच्या पायरीवर हा प्रवासी लटकलेल्या अवस्थेत रेल्वेसोबत घसरत असल्याचे येथे बंदोबस्तावर असलेले रेल्वे पोलीस कर्मचारी इमरान कुरेशी व राकेश शेडमाके यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान दाखवून तात्काळ धावत जाऊन त्या प्रवाशाच्या कमरेचा बेल्ट धरून त्याला फलाटावर सुरक्षित ओढले आणि  गोदान एक्सप्रेसला थांबवून पुन्हा त्या प्रवाशाला बोगीत सुखरूप बसवून दिले. दैव बलवत्तर असल्याने आणि रेल्वे पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे हा प्रवाशी बचावला आहे.

 

 

टॅग्स :railwayरेल्वेNashikनाशिकUttar Pradeshउत्तर प्रदेशMumbaiमुंबईPoliceपोलिसpassengerप्रवासीcctvसीसीटीव्ही