Video : आंध्रप्रदेश व्हाया मुंबई! लोकलमध्ये लाखोंचे मोबाईल चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 08:02 PM2018-11-29T20:02:53+5:302018-11-29T20:04:47+5:30

या टोळीतील काही सदस्य लोकलमध्ये जावून चोरी करत असताना इतर सदस्य स्थानकाबाहेर चारचाकी वाहन उभे करुन त्यांची प्रतिक्षा करत असत अशी मोडस ऑपरेंडी होती. पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली असून २२ मोबाईल व तवेरा गाडी जप्त केली आहे.

Andhra Pradesh, Mumbai! Inter-city gang robbery of millions of mobile phones | Video : आंध्रप्रदेश व्हाया मुंबई! लोकलमध्ये लाखोंचे मोबाईल चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Video : आंध्रप्रदेश व्हाया मुंबई! लोकलमध्ये लाखोंचे मोबाईल चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Next
ठळक मुद्दे मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पनवेल लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्याआरोपींनी शिवाजीनगर, पुणे येथे ३ मोबाईल विक्री केल्याची माहिती दिली२२ मोबाईलपैकी ९ मोबाईल चोरीच्या तक्रारी आल्याने ९ गुन्हे नोंदवण्यात आले

मुंबई - आंध्रप्रदेशमधून मुंबईत येवून लोकलमध्ये मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पनवेल लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून अडीच लाख रुपये किंमतीचे २२ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेचे पोलीस उपायुक्त (लोहमार्ग) पुरुषोत्तम कराड यांनी ही माहिती दिली.      

या टोळीतील काही सदस्य लोकलमध्ये जावून चोरी करत असताना इतर सदस्य स्थानकाबाहेर चारचाकी वाहन उभे करुन त्यांची प्रतिक्षा करत असत अशी मोडस ऑपरेंडी होती. पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली असून २२ मोबाईल व तवेरा गाडी जप्त केली आहे. २२ नोव्हेंबर रोजी खांदेश्वर येथे पोलीस पथकाला पाहून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनाचा क्रमांक नोंदवून पोलिसांनी राज्यात सतर्कतेचा इशारा दिला होता. 

हे वाहन कोल्हापूरजवळ टोलनाक्यावर दिसल्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व लोहमार्ग पोलिसांना कळवले. लोहमार्ग पोलिसांनी त्यांना मुंबईत आणून त्यांची चौकशी केली. आरोपींनी शिवाजीनगर, पुणे येथे ३ मोबाईल विक्री केल्याची माहिती दिली. त्यामध्ये मिळालेल्या १५ हजारांपैकी ५ हजारांचे इंधन टाकण्यात आले होते. उर्वरीत १० हजार रुपये पोलिसांनी जप्त केले. पोलिसांनी केलेल्या सखोल तपासणीनंतर गाडीमध्ये मागील बाजूस विशिष्ट पध्दतीचा बॉक्स बनवून त्यामध्ये मोबाईल लपवून ठेवल्याचे उघडकीस आले. त्यामध्ये १९ मोबाईल सापडले. २२ मोबाईलपैकी ९ मोबाईल चोरीच्या तक्रारी आल्याने ९ गुन्हे नोंदवण्यात आले असून १३ मोबाईलबाबत अद्याप तक्रार करण्यात आलेली नाही. वाशी ते पनवेल या मार्गावर ज्यांचे मोबाईल चोरी झाले असतील त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यास याबाबत ओळख पटवल्यानंतर गुन्हे नोंदवण्यात येतील, अशी माहिती उपायुक्त कराड यांनी दिली. 

या तपासामध्ये हार्बर मार्गाचे सहाय्यक पोलीस आयुक्त एस.एस.नावगे, पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई वायकर, मेदगे,आहिरे, पवार, धोंडे, आरेकर, महिला पोलिस शिपाई परकाळे, आदक यांनी तपास करुन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत आरोपींचा पूवेर्तिहास तपासला जात असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती कराड यांनी दिली. 

Web Title: Andhra Pradesh, Mumbai! Inter-city gang robbery of millions of mobile phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.