भयंकर! पळून लग्न केलं, ९ महिन्यांत IAS अधिकाऱ्याच्या लेकीने आयुष्य संपवलं, हुंड्यासाठी छळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 12:45 IST2025-12-03T12:45:01+5:302025-12-03T12:45:55+5:30
काही महिन्यांपूर्वी माधुरीने तिचा पती राजेश नायडूवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला होता.

भयंकर! पळून लग्न केलं, ९ महिन्यांत IAS अधिकाऱ्याच्या लेकीने आयुष्य संपवलं, हुंड्यासाठी छळ
आंध्र प्रदेशातील वरिष्ठ आयएएस अधिकारी चिन्ना रामुडू यांची २५ वर्षीय मुलगी माधुरी साहितिबाई हिने ताडेपल्ली येथील तिच्या पालकांच्या घरी आत्महत्या केली. रविवारी माधुरी बाथरूममधून बाहेर न आल्याने तिच्या कुटुंबातील सदस्यांनी दरवाजा तोडला, तेव्हा त्यांना मोठा धक्काच बसला. तपासात हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं समोर आलं.
काही महिन्यांपूर्वी माधुरीने तिचा पती राजेश नायडूवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला होता. माधुरी आणि राजेश यांनी ५ मार्च २०२५ रोजी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता आणि ७ मार्च रोजी त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली होती. त्यानंतर लग्नाची नोंदणी करण्यात आली. लग्नाच्या काही महिन्यांतच नात्यात तणाव वाढू लागला.
काही दिवसांपूर्वी माधुरीने तिच्या कुटुंबाला फोन करून सांगितलं की, तिला हुंड्यासाठी त्रास दिला जात आहे. तक्रारीनंतर, तिचे पालक तिला सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ताडेपल्ली येथे घेऊन आले. कुटुंबाने सांगितलं की ती तिच्या पतीच्या घरी परतण्यास इच्छूक नव्हती. गेल्या काही आठवड्यांपासून ती खूप तणावाखाली असल्याचं दिसून आलं. रविवारी सकाळी तिने गळफास घेतला. सध्या चौकशी सुरू आहे.
आयएएस चिन्ना रामुडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश मुलीला हुंड्यासाठी त्रास देत होता. तो तिला धमकावत असे, तिला सांगायचा की तिला कोणताही आधार नाही आणि तो तिला मारून टाकेल. माझ्या मुलीला फोन करण्यासाठीही त्याची परवानगी घ्यावी लागत असे. ती त्याच्यासोबत राहू इच्छित नव्हती, म्हणून आम्ही तिला घरी परत आणलं. तिला आशा होती की राजेश तिला परत घेऊन जाईल, पण तसं झालं नाही. आम्ही कधीही कल्पना केली नव्हती की आम्ही मुलीला गमावू.