अमेठीमध्ये डिझेल आणि पेट्रोल टंचाईच्या अफवा आणि पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागत असतानाच प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात समाजवादी पक्षाच्या (सपा) एका कार्यकर्त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात इंधन जप्त करण्यात आलं आहे. प्रशासनाने इंधन जप्त करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
अमेठी जिल्ह्यातील कोतवाली भागातील भरेथा निधीच्या पुरवा गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी प्रशासनाला एका घरात मोठ्या प्रमाणात डिझेल आणि पेट्रोल साठवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस आणि प्रशासनाच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी धाड टाकली आणि सुमारे १४०० लीटर डिझेल-पेट्रोल जप्त केलं. चार निळ्या रंगाचे ड्रम, एक पाण्याची टाकी आणि चार लहान डब्यांमध्ये बेकायदेशीरपणे हे भरून ठेवण्यात आलं होतं.
प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून पेट्रोल-डिझेलची साठवणूक करणाऱ्या दयाराम यादव नावाच्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई सुरू केली असून ते जप्त केलं आहे. पकडलेला आरोपी दयाराम यादव हा समाजवादी पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता असून तो माजी मंत्री गायत्री प्रसाद प्रजापति यांचा अत्यंत जवळचा मानला जातो.
जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान यांच्या परवानगीनंतर, पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात 'जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५' च्या कलम ३/७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत पुरवठा निरीक्षक शुभम चौधरी यांनी सांगितलं की, माहिती मिळताच छापा टाकण्यात आला, जिथे १४०० लीटर पेट्रोल-डिझेल सापडले. सध्या हे जप्त करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
Web Summary : In Amethi, authorities seized 1400 liters of petrol and diesel from a Samajwadi Party worker's home following scarcity reports. The accused, linked to a former minister, faces legal action under the Essential Commodities Act.
Web Summary : अमेठी में, समाजवादी पार्टी के कार्यकर्ता के घर से 1400 लीटर पेट्रोल और डीजल जब्त किया गया। कमी की खबरों के बाद कार्रवाई हुई। आरोपी, पूर्व मंत्री से जुड़ा है, आवश्यक वस्तु अधिनियम के तहत कानूनी कार्रवाई का सामना कर रहा है।