शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
2
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
4
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
5
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
6
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
7
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
8
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
9
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
10
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
11
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
12
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
13
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
14
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
15
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
16
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
17
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
18
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
19
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
20
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
Daily Top 2Weekly Top 5

राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:40 IST

Raja-Sonam Case: मेघालय पोलिसांच्या चौकशीत सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह हाच हत्येच्या कटाचा मास्टरमाईंड असल्याचे समोर आले. सोनम या हत्याकांडाचा भाग होती.

इंदूर - व्यावसायिक राजा रघुवंशी हत्या प्रकरण आणखी गुंतागुंतीचे बनत चालले आहे. या प्रकरणात राजाची हत्या करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हत्येचे कोडेही उलगडले आहे परंतु अद्यापही अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यामुळे सातत्याने या प्रकरणात नवनवीन हैराण करणारे खुलासे समोर येत आहेत. आता राजाची पत्नी सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने नवं रहस्य उलगडले आहे. राजाच्या हत्येनंतर हे दोघे अशा महिलेची हत्या करण्याची तयारी करत होते, ज्याबाबत पोलिसांची दिशाभूल करण्यात येत आहे. हे दोघे कुठल्याही एका महिलेची हत्या करून तिचा मृतदेह जाळणार होते, जेणेकरून ही सोनम असल्याचं पोलिसांना वाटेल हे तपासात उघड झाले.

मेघालय पोलिसांच्या चौकशीत सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह हाच हत्येच्या कटाचा मास्टरमाईंड असल्याचे समोर आले. सोनम या हत्याकांडाचा भाग होती. सोनमच्या चौकशीआधीच तिचा बॉयफ्रेंड राज आणि इतर तीन आरोपींना सोनम बुरखा घालून मेघालयातून पळाली होती हे उघड केले. टॅक्सी, बस आणि ट्रेनसारख्या माध्यमांचा वापर करून ती मध्यप्रदेशच्या इंदूर येथे पोहचली होती. राजाची मेघालयात हत्या करण्याचे षडयंत्र सोनमने ११ मे च्या लग्नानंतर केले. हा प्लॅन राजचा होता, सोनम त्यासाठी तयार झाली होती. या हत्येतील आरोपी हे राजचे मित्र होते, हत्येत सुपारी देण्याचा अँगल नाही असं पोलीस अधीक्षक विवेक सायम यांनी सांगितले. परंतु प्लॅनिंग हत्येचे होते, राजने त्याच्या ३ मित्रांसोबत आणि सोनमच्या मदतीने हे सगळे केले. 

राजाच्या हत्येसाठी बनवले होते २ प्लॅन

माहितीनुसार, राजने हत्येसाठी त्याच्या मित्रांना ५० हजार खर्चासाठी पाठवले होते. राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी २ प्लॅन बनवण्यात आले होते. पहिला प्लॅन सेल्फी घेताना राजाला धक्का मारून दरीत ढकलण्याचा होता. जर ते फेल झाले तर प्लॅन बी तयार केला होता. त्यात आधी राजाला मारून टाकायचे मग त्याचा मृतदेह दरीत फेकायचा. पहिला प्लॅन फेल झाला तेव्हा आरोपींनी प्लॅन बी नुसार राजाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह दरीत फेकून दिला.

दरम्यान, प्लॅनिंगनुसार राज कुशवाहचे मित्र आकाश राजपूत, विशाल ठाकूर आणि आनंद कुर्मी हे तिघे गुवाहाटीला आधीच पोहचले होते. गुवाहाटीत राजाच्या हत्येचे प्लॅनिंग केले होते परंतु त्यात यश आले नाही. त्यानंतर शिलांग आणि मावलाखियात गावाजवळ २ वेळा राजाला मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावेळीही हल्लेखोर अयशस्वी ठरले. त्यानंतर २३ मे दुपारी २ वाजता सावडोंग फॉल्सजवळ राजा रघुवंशीची हत्या केली. तिन्ही हल्लेखोरांनी पाळीपाळीने राजावर हल्ला केला. आकाशने रक्ताने माखलेला टीशर्ट फेकून दिला आणि सोनमचा रेनकोट घातला. मेघालयातील कोर्टाने सर्व पाच आरोपींना ८ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर पोलिसांनी आणखी तपास केला असता राज आणि सोनम सातत्याने संपर्कात असल्याचे पुढे आले. कॉल डिटेल्समधून समोर आले की, १६ मे ते २३ मे या काळात या दोघांमध्ये ३० हून अधिक वेळा बोलणे झाले. ज्यात रात्री उशिरापर्यंत आणि मेसेजवरही बोलणे होत होते. 
 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी