विवाहानंतर नवऱ्याचा चेहरा पाहून थेट पोलीस ठाण्यात पोहोचली नवरी, म्हणाली, माझी फसवणूक झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 03:35 PM2021-08-20T15:35:01+5:302021-08-20T15:35:59+5:30

Dehradun Marriage News: विवाहानंतर एका नवरीने मधुचंद्राच्या रात्रीच पतीविरोधात पोलिसांत धाव घेतली. विवाहापूर्वी या तरुणीची फसवणूक करण्यात आली होती.

After the marriage, seeing the face of the husband, the bride reached the police station directly, said, I was cheated | विवाहानंतर नवऱ्याचा चेहरा पाहून थेट पोलीस ठाण्यात पोहोचली नवरी, म्हणाली, माझी फसवणूक झाली

विवाहानंतर नवऱ्याचा चेहरा पाहून थेट पोलीस ठाण्यात पोहोचली नवरी, म्हणाली, माझी फसवणूक झाली

googlenewsNext

देहराडून - उत्तराखंडमधील सितारगंजमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे विवाहानंतर एका नवरीने मधुचंद्राच्या रात्रीच पतीविरोधात पोलिसांत धाव घेतली. सितारगंजमधील एका तरुणीचा विवाह एका वयस्कर व्यक्तीशी करण्यात आला होता. विवाहापूर्वी या तरुणीची फसवणूक करण्यात आली होती. वयस्कर नवऱ्याऐवजी एका तरुणाचा फोटो दाखवून तिला लग्नासाठी राजी करण्यात आले होते. मात्र विवाह करून ही तरुणी जेव्हा सासरी गेली. तेव्हा नवऱ्याचा चेहरा पाहून तिला धक्का बसला. तिचे लग्न लावून दिलेला नवरा वयस्कर निघाला. तो आधीपासूनच विवाहित होता. एवढेच नाही तर घरात त्याची पत्नी आणि मुलेही होती. दरम्यान, हा प्रकार पाहून ही नवरी तिथून पळाली. तिने सासरी जाण्यास नकार दिला. मग हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांसमोरही तरुणीने सासरी जाण्यास नकार दिला. (After the marriage, seeing the face of the husband, the bride reached the police station directly, said, I was cheated)

मिळालेल्या माहितीनुसार आता सदर तरुणीने वयस्कर पतीचे घर सोडून प्रियकरासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच तिने याबाबत पोलिसांकडे तक्रारही केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गंगाराम गोला यांनी सांगितले की, या प्रकरणी चौकशी करून कारवाई केली जाईल. शहरातील एक क्रमांकाच्या वॉर्डमधील तरुणी शेजारील तरुणासह पोलीस ठाण्यात पोहोचली. तरुणीने सांगितले की, तिचा विवाह बरेली जिल्ह्यातील सेंथल गावातील एका वयस्कर पुरुषासोबत लावून देण्यात आला. लग्नाला तयार करण्यासाठी तिला एका तरुणाचा फोटो दाखवण्यात आला. तो पाहून तिने लग्नाला होकार दिला. मात्र प्रत्यक्षात तिचा विवाह एका तीन मुलांच्या पित्यासोबत लावून देण्यात आला.

विवाहानंतर जेव्हा खरी बाब या तरुणीला समजली तेव्हा तिला धक्का बसला. त्यानंतर ती पुन्हा एकदा तिच्या प्रियकराच्या संपर्कात आली. आता तिने तिच्या प्रियकराशी विवाहा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दोघांचेही नातेवाईक त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हे दोघेही विवाह करण्याच्या मतावर ठाम आहेत.  

Web Title: After the marriage, seeing the face of the husband, the bride reached the police station directly, said, I was cheated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.