कोलकाता, बदलापूरनंतर आता चंदीगड...! स्कूल बस ड्रायव्हरचा 12वीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 10:03 IST2024-08-23T10:02:12+5:302024-08-23T10:03:53+5:30

या 26 वर्षीय आरोपीचे नाव मोहम्मद रज्जाक असे आहे. तो चंदीगडमधील मनीमाजरा येथील रहिवासी आहे...

After Kolkata, Badlapur now Chandigarh School bus driver repeatedly raped 12th student at her home | कोलकाता, बदलापूरनंतर आता चंदीगड...! स्कूल बस ड्रायव्हरचा 12वीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

प्रतिकात्मक फोटो

कोलकाता, बदलापूरनंतर आता चंदीगडमधूनही अत्याचाराची घटना समोर आली आहे. येथे एका मोठ्या शाळेच्या बस ड्रायव्हरला 17 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. जीरकपूर पोलिसांनी या ड्रायव्हरला बुधवारी अटक केली असून त्याने 12व्या वर्गात शिकणाऱ्या एक विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संबंधित विद्यार्थिनीला तिच्या मॉर्फ्ड फोटोच्या सहाय्याने ब्लॅकमेल करत होता. या 26 वर्षीय आरोपीचे नाव मोहम्मद रज्जाक असे आहे. तो चंदीगडमधील मनीमाजरा येथील रहिवासी आहे.

घरी जाऊन विद्यार्थिनीवर बलात्कार - 
'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार, रज्जाकने विद्यार्थिनीच्या घरी जाऊन मे ते जुलै दरम्यान तीन वेळा तिच्यावर बलात्कार केला.  पीडिता भयभीत झाली होती. अखेर तिने संपूर्ण प्रकार पालकांना सांगितला आणि पोलिसांत तक्रार दिली. यानंतर, जीरकपूर पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्यावर आयपीसीचे कलम  376 (बलात्कार), 506 (गुन्हेगारी धमक्या) आणि POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

आधी मैत्रीचा प्रयत्न मग...-
अल्पवयीन मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रज्जाक अनेक महिन्यांपासून तिचा पाठलाग करत होता आणि तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत होता. तिने त्याला मैत्रीसाठी नकार दिल्यानंतर, त्याने कौटुंबिक कार्यक्रमातील तिच्या फोटोसोबत छेडछाड केली आणि तिला दाखवून धमकावत होता.

18 मे रोजी संबंधित पीडित विद्यार्थीन आणि तिची बहिण घरी होते. तिचे आई-वडिल कामावर गेले होते. रज्जाक तिच्या घरी गेला आणि त्याने तिला ऐकले नाही, तर आपण आक्षेपार्ह फोटो सर्वांसोबत शेअर करू अशी धमकी दिली. त्याने पीडितेला संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. यानंतर, हा स्कूल ड्रायव्हर 6 जुलै आणि 26 जुलै असे दोन वेळा तिच्या घरी गेला आणि तिच्यावर बलात्कार केला होता.
 

 

Web Title: After Kolkata, Badlapur now Chandigarh School bus driver repeatedly raped 12th student at her home