अभिनेत्री झरीन खानला वेश्या म्हटल्याने माजी मॅनेजरविरोधात पोलिसांत तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 18:14 IST2018-12-07T18:11:03+5:302018-12-07T18:14:41+5:30
अंजली अथ असं या महिला आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी खार पोलीस अधिक तपास करत असून पोलिसांनी अथ हिला पुढील चौकशीसाठी बोलावले आहे.

अभिनेत्री झरीन खानला वेश्या म्हटल्याने माजी मॅनेजरविरोधात पोलिसांत तक्रार
मुंबई - अभिनेत्री झरीन खानला वेश्या म्हणून हिणवल्याने तिने तिच्या माजी मॅनेजरविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अंजली अथ असं या महिला आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी खार पोलीस अधिक तपास करत असून पोलिसांनी अथ हिला पुढील चौकशीसाठी बोलावले आहे.
अंजली अथ झरीनसाठी मॅनेजर म्हणून काम करत होती. मात्र,काही वर्षांनी अंजलीने झरीनच्या व्यवस्थापनाचं काम सोडल्यापासून दोघींमध्ये एका व्यवहारावरून वाद सुरू होते. वाद विकोपाला गेल्यानंतर झरीनला अंजलीचे कटाक्याचे भांडण झाले. या वादात अंजलीने झरीनला वेश्या म्हणून तिचे चारित्र्य हनन केले. या प्रकरणी गुरुवारी संध्याकाळी झरीनने खार पोलिस ठाण्यात अंजली विरोधात तक्रार नोंदवली. अंजलीसोबतचा करार संपल्यानंतर अंजलीने मला फोनवर धमकीचे आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवले. माझ्याविषयी खोट्या बातम्या पसवरल्या. इतक्यावरच न थांबता तिने आपल्या नावाचा गैरवापर करून अंजलीने सिनेमासृष्टीतील लोकांकडून पैसे उकळले असे झरीनने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. खार पोलीस ठाण्यात झरीन खानने अंजलीविरोधात भा. दं. वि. कलम ५०९(महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने शब्दोचार किंवा कृती करणे), ४४८, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप अंजली या आरोपी महिलेला अटक करण्यात आलेली नसल्याचे खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.