मुंबई पोलिसांच्या आवाहनाला न जुमानता अभिनेत्री शिबानी दांडेकरने केले किकी चॅलेंज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 13:30 IST2018-08-23T21:28:21+5:302018-08-24T13:30:09+5:30

भारतीय गायक, मॉडल, अभिनेत्री आणि एक अँकर शिबानी दांडेकर सध्या किकी चॅलेंजमुळे चर्चेत आहे. खरंतर तिने कारमधून खाली उतरत किकी गाण्यावर डान्स केला आहे.

Actress Shibani Dandekar made Kiki Challenge despite the Mumbai Police's appeal | मुंबई पोलिसांच्या आवाहनाला न जुमानता अभिनेत्री शिबानी दांडेकरने केले किकी चॅलेंज 

मुंबई पोलिसांच्या आवाहनाला न जुमानता अभिनेत्री शिबानी दांडेकरने केले किकी चॅलेंज 

मुंबई - किकी चॅलेंजमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली असून त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी मुंबईपोलिसांनी ट्विटरद्वारे नागरिकांना किकी चॅलेंज धोक्याचे असल्याने तसे करू नये असे आवाहन केले होते. मुंबई पोलिसांच्या या आवाहनाला न जुमानता अभिनेत्री शिबानी दांडेकरने किकी चॅलेंजचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. मुंबई पोलिसांनी अनेक वेळा सुचना दिल्यानंतरही किकी चॅलेंजचं वेड काही जात नाही आहे. 

भारतीय गायक, मॉडल, अभिनेत्री आणि एक अँकर शिबानी दांडेकर सध्या किकी चॅलेंजमुळे चर्चेत आहे. खरंतर तिने कारमधून खाली उतरत किकी गाण्यावर डान्स केला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत तिची बहिणही डान्स करत आहे. शिबानीचा हा व्हिडिओ सोशल मीडियातील इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Web Title: Actress Shibani Dandekar made Kiki Challenge despite the Mumbai Police's appeal