अभिनेत्री शमिता शेट्टीला शिवीगाळ तर वाहनचालकाला जबर मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 19:37 IST2019-01-30T19:35:38+5:302019-01-30T19:37:00+5:30

ही घटना मंगळवारी दुपारी ठाण्यातील विवयाना मॉलजवळ घडली. या घटनेनंतर शमिताने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

Actress Shamita Shetty, while driving, | अभिनेत्री शमिता शेट्टीला शिवीगाळ तर वाहनचालकाला जबर मारहाण

अभिनेत्री शमिता शेट्टीला शिवीगाळ तर वाहनचालकाला जबर मारहाण

ठळक मुद्देअभिनेत्री शमिता शेट्टीला तीन दुचाकीस्वारांकडून शिवीगाळ करण्यात आली तसेच तिच्या वाहनचालकाला जबर मारहाण करण्यात आली आहे. शमिता शेट्टी ठाण्यातील विवयाना मॉलजवळून निघाली असताना तिच्या गाडीने एका दुचाकीला धडक दिली.

ठाणे - बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीसोबत ठाण्यात धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत अभिनेत्री शमिता शेट्टीला तीन दुचाकीस्वारांकडून शिवीगाळ करण्यात आली तसेच तिच्या वाहनचालकाला जबर मारहाण करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी ठाण्यातील विवयाना मॉलजवळ घडली. या घटनेनंतर शमिताने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

मंगळवारी दुपारी शमिता शेट्टी ठाण्यातील विवयाना मॉलजवळून निघाली असताना तिच्या गाडीने एका दुचाकीला धडक दिली. या धडकेनंतर तीन दुचाकीस्वारांनी शमिताला शिव्या देत तिच्या वाहन चालकाला जबर मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्या तिघांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ते पसार झाले. या घटनेबाबत शमिताने राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ३ आरोपींच्याविरोधात भा. दं. वि. कलम 279, 323, 504, 427 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: Actress Shamita Shetty, while driving,