शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
2
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
3
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
4
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
5
नेत्रदीपक भरारी! पायल कपाडियांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
6
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
7
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
8
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
9
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
10
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
11
ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!
12
वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
13
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
14
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
15
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
16
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
18
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
19
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
20
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या अभिनेत्रीला ठाण्यात अटक; ज्युनिअर कलाकारांना जादा पैशांचे आमिष द्यायची...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 04:55 IST

हिंदी मालिका आणि मॉडेलिंगमधील ज्युनिअर कलाकारांना जादा पैशांचे आमिष दाखवून त्यांना देह विक्रयाच्या व्यवसायात ढकलणारी अभिनेत्री दलाल म्हणूनही काम करीत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली हाेती.

लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दहा हजारांचे आमिष दाखवून टीव्ही मालिका तसेच माॅडेलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या नवख्या कलाकार तरुणींना सेक्स रॅकेटमध्ये अडकविणाऱ्या २७ वर्षीय दलाल अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने रविवारी ही माहिती दिली. यावेळी दाेन पीडित तरुणींची सुटका केली. त्यांना महिला गृहात पाठविण्यात आले आहे. 

हिंदी मालिका आणि मॉडेलिंगमधील ज्युनिअर कलाकारांना जादा पैशांचे आमिष दाखवून त्यांना देह विक्रयाच्या व्यवसायात ढकलणारी अभिनेत्री दलाल म्हणूनही काम करीत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली हाेती. त्या आधारे पाेलिस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहायक पाेलिस आयुक्त रवींद्र दाैंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पेालिस निरीक्षक वैशाली गाेरडे, उपनिरीक्षक स्नेहल शिंदे आणि हवालदार व्ही. आर. पाटील आदींच्या पथकाने दि. २८ फेब्रुवारीला दुपारी २.३५ वाजेच्या सुमारास मासुंदा तलाव परिसरात सापळा लावून अभिनेत्रीला अटक केली. ती स्वत: काही हिंदी मालिकांमध्ये कलाकार म्हणून काम करीत असून तिच्यासाेबत माॅडेलिंग आणि यू ट्यूब चॅनलवर काम करणाऱ्या तिच्या ओळखीच्या काही महिला आणि तरुणींना ती शरीर विक्रय करण्यासाठी प्रवृत्त करीत असल्याचे चाैकशीत उघड झाले.

पाेलिसांनी पाठविलेल्या बनावट ग्राहकाकडून तिने  ३० हजार रुपये घेतले हाेते. २० हजार रुपये स्वत:कडे ठेवून दहा हजार रुपये पीडित तरुणीला देण्याचे ठरले हाते. वर्षभरापासून सेक्स रॅकेट चालवित असल्याची कबुलीही तिने पाेलिसांना दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Actress Arrested in Thane for Running Sex Racket; Victims Rescued

Web Summary : A 27-year-old actress was arrested in Thane for running a sex racket, luring junior artists with money. Two victims were rescued. The actress confessed to running the racket for a year, exploiting women from modelling and YouTube.
टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेट