शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात दुहेरी हत्याकांडातील आरोपींला पुण्यात अटक; जेवणावरून झाला होता वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 17:31 IST

लॉकडाऊनमध्ये जेवणावरुन झालेल्या वादातून फावड्याने केला होता खून

पुणे : ठाणे येथील शबरी बार अँड रेस्टॉरंटमध्ये व्यवस्थापक व एका कामगाराचा खून करुन त्यांचे मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून फरार झालेल्याला पुण्यात पकडण्यात आले. कल्लू राजेश यादव (वय ३४, रा. उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे.याप्रकरणी बारमालक गंगाधर शिना पय्याडे (वय ६३, रा. शांती निकेतन, मालाड पूर्व) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे शबरी बार अँड रेस्टॉरंट हे हॉटेल लॉकडाऊनमुळे बंद आहे. सर्व कामगार गावी गेले असून व्यवस्थापक हरिश शेट्टी(वय ४८), मोरी कामगार नरेश पंडित (वय ५२) आणि कल्लु यादव हे तिघेच हॉटेलमध्ये होते. मॅनेजर हरिश शेट्टी व नरेश पंडित यांचा खुन करुन त्यांचा मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून दिलेल्या आढळून आला. त्यावेळीकल्लु यादव आढळून न आल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय होता. तो शेट्टीचा मोबाईल घेऊन पळून गेला होता. मोबाईल ट्रेस केला असता तो पुण्यात असल्याचे आढळून आले. त्यानुसार ठाणेपोलिसांनी स्वारगेट पोलिसांशी संपर्क साधला.निलायम हॉटेलजवळील एका हॉटेलमध्ये तो उतरला होता. स्वारगेट पोलिसांनी यादव याला पकडून ठाणे पोलिसांच्या हवाली केले. स्वारगेट पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध २०१५ मध्ये मारामारी व दारुबंदीचा गुन्हा दाखलअसून तेव्हा त्यांच्यावर प्रतिबंधकात्मक कारवाई करण्यात आली होती. कल्लु यादव याच्याविरुद्ध कोलकत्ता येथे खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्यात तो तुरुंगातही जाऊन आला आहे.

 

कल्लु यादव याने यापूर्वी पुण्यातील हॉटेलमध्ये ८ वर्षे काम केले होते. गेल्या वर्षीपासून तो शबरी बारमध्ये कामाला होता. व्यवस्थापक शेट्टीस्वत: हॉटेलमधून जेवण मागवून खात होता. आरोपींना डाळ, भात खाण्यास देत होता. यावरुन त्यांच्या भांडणे झाली होती. तेव्हा शेट्टी व पंडित यांनी त्याला मारहाण केली होती. त्या रागातून ते दोघे झोपलेले असताना यादव याने फावड्याने त्यांच्या डोक्यावर, चेहर्‍यावर, गळ्यावर वार करुन त्यांचा खुन केला व त्यांचे मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून पळून गेला होता. जाताना तो शेट्टीचा मोबाईल स्वत: बरोबर घेतला होता. त्या मोबाईलवरुनच पोलिसांनी यादवचा माग काढत ते पुण्यात पोहचले. खून केल्यानंतर यादव मालवाहतूक आणीभाजीपाला वाहतूकीच्या वेगवेगळ्या सहा वाहनांमधून प्रवास करुन पुण्यात आला होता. येथे तो निलायम थिएटरजवळील एका हॉटेलमध्ये उतरला होता. तेथेच पोलिसांनी त्याला पकडले.

 

टॅग्स :PuneपुणेthaneठाणेMurderखूनPoliceपोलिसArrestअटक