आयटम म्हणाला अन् तरुणीने पाठलाग करत पकडले आरोपीला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 17:27 IST2019-09-24T17:25:58+5:302019-09-24T17:27:16+5:30

आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Accuse said item to girl and the young girl chased the accused by followed him | आयटम म्हणाला अन् तरुणीने पाठलाग करत पकडले आरोपीला  

आयटम म्हणाला अन् तरुणीने पाठलाग करत पकडले आरोपीला  

ठळक मुद्दे तक्रारदार महिलेने विलेपार्ले परिसरात २६ वर्षीय आरोपीचा पाठलाग करुन त्याची धरपकड केली होती आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. ही घटना घडली त्यावेळी आरोपीने मद्यपान केले होते असा दावा केला जात आहे.

मुंबई - मुंबई विमानतळावर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला आयटम म्हणणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. तक्रारदार महिलेने विलेपार्ले परिसरात २६ वर्षीय आरोपीचा पाठलाग करुन त्याची धरपकड केली होती आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. 

मुंबई विमानतळावर काम करणारी तक्रारदार महिला कर्मचारी संध्याकाळी काम संपवून घराकडे निघाली होती. राजेंद्र प्रसाद नगर परिसरातील बस स्टॉपवर महिलेला तिच्या कार्यालयातील सहकाऱ्याने सोडलं. त्यावेळी २६ वर्षांच्या दिनेश यादवने तिला पाहून आयटम अशी हाक मारली. त्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा महिलेने पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. नंतर दिनेशला पकडून तिने पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. ही घटना घडली त्यावेळी आरोपीने मद्यपान केले होते असा दावा केला जात आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात भा. दं. वि. कलम ३५४ (अ) , ५०९  अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
 

Web Title: Accuse said item to girl and the young girl chased the accused by followed him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.