Accident : डंपरच्या धडकेत दोन तरुण ठार, चालक पसार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 21:26 IST2021-09-19T21:26:05+5:302021-09-19T21:26:55+5:30

Accident :याप्रकरणी डंपर चालकाविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Accident: Two youths killed in dumper collision, driver passes | Accident : डंपरच्या धडकेत दोन तरुण ठार, चालक पसार 

Accident : डंपरच्या धडकेत दोन तरुण ठार, चालक पसार 

ठळक मुद्देमोहम्मद शाकीर अली जाकीर अली ( २८) आणि शमीम शाह (२६, रा.मध्य प्रदेश ) अशी मृतांची नावे आहेत.

चाळीसगाव, जि.जळगाव :  भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार दोन तरुण जागीच ठार झाले. ही घटना  रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाच्या भैरवनाथ मंदिराजवळ  घडली. मोहम्मद शाकीर अली जाकीर अली ( २८) आणि शमीम शाह (२६, रा.मध्य प्रदेश ) अशी मृतांची नावे आहेत.


याप्रकरणी डंपर चालकाविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 पीओपीचे बांधकाम कामगार असलेले मोहम्मद अली व शमीम शाह हे दोघेजण दुपारी  कामानिमित्त कजगाव येथे निघाले होते.  भडगाव रस्त्यावर वाघळी गावालगतच्या भैरवनाथ मंदिराजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या डंपरने धडक दिली. यात या दोघे जण जागीच ठार झाले. अपघातानंतर डंपरचा चालक पसार झाला.

Web Title: Accident: Two youths killed in dumper collision, driver passes