लोखंडी गज घेऊन जाणाऱ्या गाडीचा अचानक ब्रेक दाबल्याने भीषण अपघात ; तिघांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 16:27 IST2019-03-14T16:26:47+5:302019-03-14T16:27:54+5:30
कासुर्डी येथे अचानक गाडी आडवी आल्याने चालकाने अचानक ब्रेक दाबले.परंतु, यावेळी ट्रकमध्ये असणारे लोखंडी रॉड केबिनमध्ये घुसले.

लोखंडी गज घेऊन जाणाऱ्या गाडीचा अचानक ब्रेक दाबल्याने भीषण अपघात ; तिघांचा जागीच मृत्यू
यवत : लोखंडी गज घेऊन जाणाऱ्या गाडीचा अचानक ब्रेक दाबल्याने गाडीमधील लोखंडी गज गाडीच्या कॅबिनमध्ये घुसून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.ही घटना आज (दि.१३) रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पुणे- सोलापूर महामार्गावरील कासुर्डी (ता.दौंड) टोल नाक्यावर घडली. ट्रक ( केए.५६.३०६३) हा सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे जात असताना कासुर्डी येथे अचानक गाडी आडवी आल्याने चालकाने अचानक ब्रेक दाबले.परंतु यावेळी ट्रकमध्ये असणारे लोखंडी रॉड केबिनमध्ये घुसले. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅकच्या केबिनचा पूर्ण चेंदामेंदा झाला असून यात आणखी लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्व मृत परप्रांतीय असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.यवत पोलीस पुढील तपास करत आहे.