मित्राकडूनच अत्याचार; शाळकरी मुलगी गर्भवती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 07:50 IST2023-08-07T07:49:55+5:302023-08-07T07:50:05+5:30

ठाण्यातील डायघर पोलिसांत गुन्हा दाखल

Abuse by a friend; School girl pregnant | मित्राकडूनच अत्याचार; शाळकरी मुलगी गर्भवती 

मित्राकडूनच अत्याचार; शाळकरी मुलगी गर्भवती 

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एका १२ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तिच्याच एका १६ वर्षीय मित्रावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती डायघर पोलिसांनी रविवारी दिली. पीडित मुलगी अडीच महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  यातील अल्पवयीन आरोपीला भिवंडीच्या बाल न्यायालयात पाठविण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

 डायघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी डायघर भागातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला अल्पवयीन मुलगाही याच भागातील एका शाळेत जातो. या दोघांची एकमेकांशी गेल्या दोन वर्षांपासून चांगली मैत्री आहे. याच मैत्रीतून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. शाळेत जाण्याच्या बहाण्याने ते एकमेकांना भेटत असत. त्यांच्या या प्रकाराबद्दल दोघांचेही कुटुंबीय अनभिज्ञ होते.

दोघांच्याही भेटीदरम्यान चार ते पाच महिन्यांपूर्वी या मुलाने तिच्याशी जवळीक साधत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मात्र, याची तिने कुटुंबीयांना कोणतीही माहिती दिली नाही. 
तिच्या पोटात गेल्या काही दिवसांपासून दुखत होते, तसेच मासिक पाळीचाही त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी ती अडीच महिन्यांची गरोदर असल्याचा प्रकार उघड झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी तिच्याकडे चौकशी केल्यानंतर या प्रकाराची माहिती तिने कुटुंबीयांना दिली. 

हा प्रकार समजल्यानंतर कुटुंबाला धक्काच बसला. या मुलीच्या तक्रारीवरून याप्रकरणी ४ ऑगस्ट रोजी रात्री बलात्कारासह पोक्सोअंतर्गत डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या मुलाला बाल न्यायालयात पाठविले जाणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गावडे यांनी सांगितले.

Web Title: Abuse by a friend; School girl pregnant