शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
5
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
6
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
7
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
8
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
9
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
10
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
11
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
12
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
13
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
14
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
15
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
16
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
17
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
18
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
19
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
20
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण

लोणी काळभोर येथे महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ व मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 6:45 PM

ही महिला रस्त्यावरून ये - जा करत असलेल्या वाहनांना हात करून थांबण्याची विनंती करत असत. वाहनाचा वेग कमी होताच ती चालकाला मारहाण करत होती.

लोणी काळभोर : लोणी काळभोर येथे मद्यधुंद अवस्थेतील महिलेने पोलीस महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करुन मारहाण केली. ही घटना रविवारी(दि. ३१) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका रावसाहेब धावडे यांनी फिर्याद दिली आहे.आरोपी महिलेविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहा योगेश पारखे (सध्या रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर, मुळ रा. भिमनगर, दौंड, ता. दौंड )असे महिला आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ही महिला रस्त्यावरून ये - जा करत असलेल्या वाहनांना हात करून थांबण्याची विनंती करत असत. वाहनाचा वेग कमी होताच ती चालकाला मारहाण करत होती. ही घटना लक्षात आल्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्याने तिला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात चल म्हटले याचा राग मनात धरुन आरोपी महिलेने पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केली.आरोपी नेहा ही गुन्हा दाखल होण्यापुर्वीच फरार झाली असून आठ महिन्यांपूर्वी दारुच्या नशेत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात वरील प्रमाणेच गोंधळ घातल्याची तक्रार आहे. ही महिला एका दुचाकीस्वाराला मारहाण करताना आढळल्यावर पोलीस पथकाने तिला अडवून रस्त्यावरून बाजूला होण्यास सांगितले. हे ऐकताच ती शिवीगाळ करू लागली. प्रियंका धावडे यांनी तिला नाव विचारले असता तिने नेहा पारखे असे सांगितले. यानंतर धावडे यांनी तिला सरकारी गाडीत बसण्यास सांगितले. यावेळी तिने मी गाडीत बसणार नाही. तुला काय करायचे ते कर असे म्हणून धावडे यांचे केस पकडले व रस्त्यावर पाडले. महिला कर्मचा-यांस मारहाण होत आहे. ही मारहाणीचे चित्र पाहून सहकारी पोलीस कर्मचारी तिकडे जावू लागले. त्यावेळी ही महिला अंधाराचा फायदा घेवून पळून गेली. पोलीस पथकाने तिचा शोध घेतला. परंतू ती अद्याप सापडलेली नाही.       वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर म्हणाले, महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या पारखे या महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबधित महिलेला अटक करण्याच्या सुचना पोलिसांना दिल्या आहेत. यापूर्वी पोलिस ठाण्याच्या आवारात दारुच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या स्थानिक पुढाऱ्याला योग्य ती समज देण्यात आली असून, याबाबतची माहिती वरिष्ठांना देण्यात आली आहे. कायदा व सुवस्था राखणे पोलिसांचे काम असुन, यात गडबड अथवा लुडबुड करण्याचा प्रयत्न करणाºयांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला