Pune Crime: नवरा-बायकोच्या भांडणाचा भीषण शेवट! ११ महिन्याच्या निष्पाप चिमुरड्याचा त्रिशूळ लागून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 08:36 IST2025-07-11T08:35:54+5:302025-07-11T08:36:20+5:30
Daund Crime News: केडगाव परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबात नवरा-बायकोमध्ये काही कारणावरून जोरदार वाद झाला.

Pune Crime: नवरा-बायकोच्या भांडणाचा भीषण शेवट! ११ महिन्याच्या निष्पाप चिमुरड्याचा त्रिशूळ लागून मृत्यू
Daund Crime: दौंड तालुक्यातील केडगाव येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नवरा-बायकोच्या भांडणात मध्ये ११ महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, केडगाव परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबात नवरा-बायकोमध्ये काही कारणावरून जोरदार वाद झाला. संतापलेल्या पत्नीने नवऱ्यावर त्रिशूळाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या झटापटीत शेजारी उभ्या असलेल्या भावजयीच्या हातातील अवघ्या ११ महिन्याच्या चिमुकल्याला त्रिशूळ लागले. त्रिशूळाचा जबरदस्त घाव लागल्याने बाळ गंभीर जखमी झाले आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमागे कोणतीही अंधश्रद्धा, धार्मिक कर्मकांड किंवा तांत्रिक प्रकार कारणीभूत आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.