नराधम बापाने मुलीवर शारीरिक अत्याचार करून केली हत्या, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 18:09 IST2022-07-15T18:08:44+5:302022-07-15T18:09:19+5:30

Sexual Assault and murder Case : या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांनी वासनांध बापाला बेड्या ठोकल्या आहेत.          

A cruel father killed his daughter by physically abusing her in bhiwandi | नराधम बापाने मुलीवर शारीरिक अत्याचार करून केली हत्या, परिसरात खळबळ

नराधम बापाने मुलीवर शारीरिक अत्याचार करून केली हत्या, परिसरात खळबळ

भिवंडी : भिवंडी शहरात एका दारुड्या बापाने आपल्या पोटच्या दहा वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार करीत तिचा गळा आवळून हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली आहे .या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांनी वासनांध बापाला बेड्या ठोकल्या आहेत.
         

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार भिवंडी शहर पोलीस ठाणे हद्दीत सहावी इयत्ते मध्ये शिकणारी एक चिमुरडी आपल्या आईवडिलांसह राहत होती .बापाला दारूचे व्यसन असल्याने तो कोणतेही काम न करता घरी बसून राहत असल्याने त्याची पत्नी गोदामात काम करून आपल्या कुटुंबाची गुजराण करीत होती. गुरुवारी महिला नेहमी प्रमाणे कामाला गेली असताना घरी मुलगी व बाप असे दोघेच होते.सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास महिला घरी आली असता तिला दरवाजावर कडी लागलेली दिसली तिने कडी उघडून घरात जाताच तिला आपली मुलगी निपचित पडल्याचे दिसले .तिने तात्काळ आरडाओरड करीत शेजाऱ्यांना जमा केले. 

मुलीला रुग्णालयात घेऊन गेले असता ती मृत असल्याचे घोषित केले.या घटनेची माहिती कळताच शहर पोलोस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन तास परिसर पिंजून काढत पळून गेलेल्या आरोपीस पकडून ताब्यात घेतले .शुक्रवारी ठाणे न्यायालयात आरोपी असलेल्या नराधम बापास हजर केले असता त्यास न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे .

Web Title: A cruel father killed his daughter by physically abusing her in bhiwandi