एक्स गर्लफ्रेंडशी पुन्हा संबंध जोडण्यासाठी रचला कट; अपघात घडवून आणल्याचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 13:58 IST2026-01-07T13:39:40+5:302026-01-07T13:58:43+5:30
कोन्नी येथील मम्मुडू येथील रहिवासी रणजित राजन आणि पय्यानमोन येथील रहिवासी त्याचा मित्र अजस अशी आरोपींची ओळख पटली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजितचे पूर्वी त्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते, तो पु्न्हा एकदा हे नाते जुळवण्यासाठी प्रयत्न करत होता.

एक्स गर्लफ्रेंडशी पुन्हा संबंध जोडण्यासाठी रचला कट; अपघात घडवून आणल्याचा धक्कादायक खुलासा
केरळमधील पथनमथिट्टा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक रस्ता अपघात झाला होता, हा अपघात घडवून आणल्याचे समोर आले आहे. २४ वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या मित्राने अपघाताचा प्लान केला होता. यामध्ये एक महिला जखमी झाली. महिलेचा विश्वास आणि सहानुभूती मिळवण्यासाठी हा अपघात घडवून आणल्याचे तापास समोर आले.
मुस्तफिजुर रहमानचा बांगलादेशने बदला घेतला; भारतीय अँकरला बीपीएलमधून बाहेर काढले
कोन्नी येथील मम्मुडू येथील रहिवासी रणजित राजन आणि त्याचा मित्र अजस (१९), पय्यानमोन येथील रहिवासी अशी आरोपींची ओळख पटली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजितचे पूर्वी त्या महिलेशी प्रेमसंबंध होते आणि तो ते पुन्हा सुरू करू इच्छित होता.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता, महिला कोचिंग क्लास संपवून अडूरहून स्कूटरवरून घरी परतत होती. ज्यावेळी ती महिला वझामुट्टोम पूर्वेला पोहोचली तेव्हा एक कार तिच्या मागे येत होती. काही क्षणातच, कारने स्कूटरला मागून धडक दिली. ती महिला रस्त्यावर पडली, पण कार थांबली नाही. कार वेगात निघून गेली.
इनोव्हा कारमध्ये असलेला रणजित घटनास्थळी पोहोचला
तिथे येणाऱ्या लोकांनी तातडीने महिलेला मदत केली. इनोव्हा कारमध्ये असलेला रणजित घटनास्थळी पोहोचला. रणजितने लोकांना सांगितले की तो तिचा पती आहे आणि नंतर तिला कोची येथील एका खाजगी रुग्णालयात घेऊन गेला. पोलिसांनी ही घटना पूर्वनियोजित असल्याचे सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला गंभीर दुखापत झाली आहे, यामध्ये उजव्या हाताच्या कोपराला जखम झाली, करंगळीलाही जखम झाली, शरीरावर ओरखडे आणि जखमा आहेत. सुरुवातीला महिलेच्या जबाबावरून अपघाताचा गुन्हा दाखल केला. पण नंतर पूर्वनियोजित कट करुन हत्या करण्याचे आरोप केले. पुढे काही दिवसांनी संशय आला. चौकशीदरम्यान जबाब जुळत नव्हते.
हा अपघात अपघात नव्हता तर पूर्वनियोजित कट होता, असे पोलिसांना दिसून आले. अजसने रणजितच्या सांगण्यावरून जाणूनबुजून स्कूटरला धडक दिली आणि रणजितने महिलेला कुटुंबाची सहानुभूती मिळवण्यास मदत केली.
सत्य समोर आल्यानंतर, पोलिसांनी या प्रकरणात हत्येच्या प्रयत्नाचे आरोप केले आहेत .आरोपींच्या या नियोजनामुळे एका कुटुंबाचे गंभीर नुकसान झाले.